Join us  

Aai Kuthe Kay Karate: ‘आई कुठे काय करते’मध्ये नवा ट्विस्ट, अभिषेकने वाढवलं अरूंधतीचं टेन्शन!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 1:11 PM

Aai Kuthe Kay Karate Latest Episode : स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ प्रेक्षकांची आवडती मालिका. आता मालिका म्हटल्यावर त्यात नवनवे ट्विस्ट येत राहणारच. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे.

Aai Kuthe Kay Karate:  स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. प्रेक्षकांची ही आवडती मालिका. आता मालिका म्हटल्यावर त्यात नवनवे ट्विस्ट येत राहणारच. सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे. होय, आता कुठे मालिकेत सगळं काही सुरळीत झालं होतं. यशची जेलमधून सुटका झाल्यावर आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव आला होता. सगळे टेन्शन फ्री झाले होते. यश नीलच्या खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. पण अरुंधतीने त्याची  निर्दोष सुटका केली आणि त्याला जेलमधून सुखरूप घरी आणलं. पण आता परत अरुंधती समोर एक नवं संकट आणि नवं टेन्शन उभं राहत आहे. ते म्हणजे तिचा दुसरा मुलगा  अभिषेकबद्दल आहे. होय, आता मालिकेत अरूंधती आणि अभिषेक यांच्या नात्यात नाराजी निर्माण होणार आहे.  

मालिकेच्या नवा प्रोमो समोर आला आहे. त्यानुसार देशमुखांच्या घरी सगळेजण आनंदात यशचा वाढदिवस साजरा करत आहेत. देशमुख कुटुंबातले सगळे जण या आनंदात सामील झाले आहेत. आशुतोष आणि नितीनही तेथे आलेले आहेत. तेवढ्यात अभिषेक संतापात घरात येतो. घरात येताच तो अनघाच्या अंगावर ओरडतो.  ‘अनघा तुला चेकअपला यायला सांगितलं होतं ना, ते न करता तू या असंस्कारी माणसाचा वाढदिवस साजरा करतीयस...,’ असं तो म्हणतो. त्याचे हे शब्द ऐकून अरूंधती संतापते. ‘अभिषेक तू आता जे करतोयस तेही आमचे संस्कार नाहीत,’ असं ती अभिषेकला सुनावते. त्यानंतर अभिषेक अनघाचा हात धरत आपण घर सोडून जाऊ असे म्हणतो. पण अनघा त्याच्यासोबत जाण्यास नकार देते  आणि ‘मी माज्या  बाळाला याच घरात, याच संस्कारात वाढवणार आहे,’ असं त्याला स्पष्ट सांगते.

आता अनघाच्या या  निर्णयामुळे अनघा आणि अभिषेक यांच्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. अरूंधती या नव्या संकटाला कशी सामोरी जाते, अभिषेकला कशी समजावते? अभिषेक देशमुखांचं घर सोडून जातो की नाही, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकारस्टार प्रवाह