Join us  

'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' या मालिकेतील सृष्टी जैनने रचला हा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:16 PM

दिग्दर्शकाला अपेक्षित आदर्श शॉट मिळेपर्यंत एकाच प्रसंगाचे वारंवार टेक घेण्याचे प्रसंग बऱ्याचशा सेटवर नेहमी दिसून येतात. अशाच प्रकारचा एक विनोदी प्रसंग सृष्टी जैन म्हणजे जयाच्या बाबतीत मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नेहमीच घडत आहे.  

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो ही मालिका प्रसारित होत असून यात सृष्टी जैन आणि नमिश तनेजा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांच्याही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेतील कलाकार सध्या त्यांच्या व्यक्तिरेखांवर प्रचंड मेहनत घेत आहेत. 

दिग्दर्शकाला अपेक्षित आदर्श शॉट मिळेपर्यंत एकाच प्रसंगाचे वारंवार टेक घेण्याचे प्रसंग बऱ्याचशा सेटवर नेहमी दिसून येतात. अशाच प्रकारचा एक विनोदी प्रसंग सृष्टी जैन म्हणजे जयाच्या बाबतीत मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियोच्या सेटवर नेहमीच घडत आहे.  कारण सृष्टीने 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' हा संवाद कार्यक्रम सुरू झाल्यापासून कमीत कमी १००० वेळा तरी म्हटला असेल असे तिचे म्हणणे आहे. त्यामुळे या संवादाला आता तिला रिटेकची गरजच लागत नाही.

पडद्यावर नववधूची भूमिका साकरणाऱ्या सृष्टी जैनचे म्हणजेच जयाचे प्रेक्षकांकडून भरपूर कौतुक होत आहे. जयाच्या आईच्या सतत होणाऱ्या हस्तक्षेपामुळे ही वधू आपलं सासर सोडण्याच्या मार्गावर आहे आणि ती नमिश म्हणजे तिच्या पडद्यावरील नवऱ्याला, समरला सारखी धमकी देत असते की ''मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो'.... ही ओळ तिनी इतक्या वेळेला म्हटली आहे की, तिला पूर्ण विश्वास आहे की आता हा एक विश्वविक्रम झाला असेल. सृष्टी जैन या गोष्टीला दुजोरा देताना म्हणाली, "मी ही ओळ अनेक वेळा म्हटली आहे. जेव्हा मी मित्रमंडळींबरोबर भेटणं टाळते तेव्हा ते मला हीच ओळ ऐकवून चिडवतात. सेटवरसुद्धा सगळे सहकलाकार हीच ओळ म्हणतात आणि जोरजोरात हसतात. मला खात्री आहे की मी आतापर्यंत हे हजारपेक्षा जास्त वेळेस म्हटली असेन. मला वाटतं मी याची मोजून नोंद ठेवली पाहिजे! कोणास ठाऊक कदाचित 'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' दहा लाख वेळा म्हटल्याबद्दल याची विश्वविक्रमात नोंद होईल!"

'मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो' ही मालिका प्रेक्षकांना सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवर सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ८:३० वाजता पाहायला मिळते.

टॅग्स :में मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो