Join us

Govinda Son : गोविंदानं पहिल्यांदाच मुलगा यशवर्धनसह केला भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “हा तर…”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 16:32 IST

'इंडियन आयडॉल 13'च्या सेटवर पहिल्यांदाच गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन यांनी एकत्र डान्स केला.

बॉलिवूडमधील नंबर 1 हिरो म्हटल्या जाणाऱ्या गोविंदाने त्याचा मुलगा यशवर्धन आहुजासोबत पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर जबरदस्त डान्स केला. वास्तविक गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा 'इंडियन आयडॉल 13' च्या सेटवर पोहोचले होते. या ठिकाणी खूप धमाल, अनेक किस्से आणि त्याच्या मुलासोबत गोविंदाचा जबरदस्त परफॉर्मन्स होता. यावेळी मंचासमोर दिग्गज अभिनेते धर्मेंद्र उपस्थित होते आणि पिता-पुत्रांना एकत्र नाचताना पाहून त्यांनादेखील राहावलं नाही.

गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा 'इंडियन आयडॉल 13' मध्ये पोहोचले, जिथे पती-पत्नीने कॅमेरासमोर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही किस्से शेअर केले. सुनीता आहुजा यांनी त्यांच्या गरोदरपणाच्या दिवसांतील एक मजेशीर किस्सा सांगितला. आता ज्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे तो गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धनचा डान्स व्हिडिओ आहे. खरं तर, 'इंडियन आयडॉल 13' च्या मंचावर पहिल्यांदाच गोविंदा आणि त्याचा मुलगा यशवर्धन एकत्र थिरकले.

‘कुली नंबर वन’च्या गाण्यावर थिरकलेरिॲलिटी शोच्या मंचावर गोविंदा आणि यशवर्धन या दोघांचे स्वागत आदित्य नारायण यानं केले. यानंतर आदित्यनं त्याला परफॉर्मन्स पाहिल्याशिवाय जाऊ देणार नसल्याचे म्हटले. यानंतर गोविंदाही आपल्या मुलासोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर आला. गोविंदाने आपल्या मुलासोबत 'कुली नंबर 1' या त्याच्याच चित्रपटातील 'गोरिया चुरा ना मेरा जिया' गाण्यावर जबरदस्त डान्स केला.

फॅन्स झाले इम्प्रेसगोविंदा आणि त्याच्या मुलाला वडिलांसोबत स्टेजवर डान्स करताना पाहून लोक त्याचे कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले - हा तर डॅशिंग आहे, एकदम हिरोसारखा आहे. डॅशिंग आणि हँडसम लिहून अनेकांनी यशवर्धनचे त्याच्या लूकचे कौतुक केले आहे.

टॅग्स :गोविंदाइंडियन आयडॉल