Join us

‘बाजीराव मस्तानी’तील भूमिकेवरून घेतली सोनिया सिंगने प्रेरणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 18:40 IST

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये मेहताब कौरची आई सरदारनी सडा कौरची भूमिका शक्य तितकी अस्सल साकार करण्यासाठी नामवंत अभिनेत्री ...

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’मध्ये मेहताब कौरची आई सरदारनी सडा कौरची भूमिका शक्य तितकी अस्सल साकार करण्यासाठी नामवंत अभिनेत्री सोनिया सिंग कोणतीही कसर बाकी ठेवत नाही. आता आपली भूमिका वास्तव वाटण्यासाठी ती चक्क तलवारबाजीचे धडेही घेत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दीपिका पदुकोणला एका लढाऊ राजकन्येच्या भूमिकेत पाहून सोनिया सिंग थक्क झाली होती. तेव्हापासून तिला केवळ सुंदर दिसणे आणि नाट्य़पूर्ण संवाद म्हणणे यापेक्षा अधिक काहीतरी करण्याची इच्छा होती. त्यामुळेच जेव्हा तिला सांगण्यात आले की तिला ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या मालिकेसाठी तलवारबाजीचे धडे घ्यावे लागतील, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेना. तिने एका व्यावसायिक तलवारबाजाकडून तलवार युध्दाचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. याद्वारे तिला केवळ आपली भूमिकाच वास्तववादी बनवायची नव्हती, तर तलवारबाजीचे कौशल्यही आत्मसात करायचे होते. यासंदर्भात सोनियाकडे विचारणा केली असता ती म्हणाली, “हो, एका लढाऊ महिलेची भूमिका साकारावी असं मला नेहमीच वाटत होतं. आता या मालिकेतील माझी भूमिका अस्सल वाटावी, यासाठी मी एका प्रोफेशनलकडून तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात दीपिका पदुकोणला तलवारबाजी करताना पाहून मलाही तलवारबाजी शिकण्याची इच्छा झाली. तसंच माझी भूमिका अस्सल वाटावी, यासाठीही मी ही कला शिकत आहे असल्याचे तिने म्हटले आहे.तसेच मालिकेतील कलाकार भूमिकेसाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहेत. सोनिया सिंगप्रमाणेच दमनप्रित हा कलाकारही त्याच्या भूमिकेसाठी मार्शल आर्टसचे प्रशिक्षण घेत आहे.