म्हणून मौनी रायने दिला ‘इंटिमेट सीन’ला नकार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 18:40 IST
चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स देणे आता फारक कॉमन झाले आहे. टीव्हीवरही आता इंटिमेट सीन्स दिसू लागले आहेत. काही मालिकांत सीन्स ...
म्हणून मौनी रायने दिला ‘इंटिमेट सीन’ला नकार!
चित्रपटांमध्ये इंटिमेट सीन्स देणे आता फारक कॉमन झाले आहे. टीव्हीवरही आता इंटिमेट सीन्स दिसू लागले आहेत. काही मालिकांत सीन्स चांगलेच गाजले. मात्र ‘नागिन २’ फेम मौनी राय हिने इंटिमेट सीनला नकार दिला असल्याचे समजते. यामागे तिला हवा असलेला एक ांत असे सांगण्यात येत आहे. इंटिमेट सीन्स करताना अभिनेत्यांना नेहमीच अडचण येते अशा बातम्या प्रसिद्ध होत असतात. चित्रपटामध्ये इंडिमेट सीन्सची शूटिंग करताना तेथे फारच कमी लोक उपस्थित असतात. अशा सीन्ससाठी कमी लोकांची गरज असते हे देखील तेवढेच खरे. मात्र टीव्ही मालिकांचे तसे नाही. येथे शूटिंग लोकेशनवर बºयाच लोकांची हजेरी असते. जर मालिका ‘नागिन २’ सारखी प्रसिद्ध व चांगली टीआरपी मिळविणारी असेल तर तेथे मीडियाच्या लोकांची देखील मोठी उपस्थिती असतेच. स्पॉटबॉय या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार; नागिन २मध्ये प्रमुख भूमिकेत असणारी अभिनेत्री मौनी राय व करणवीर शर्मा यांच्यावर इंटिमेंट सीन शूट करायचा होता. या सीन्सची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र ऐन वेळेवर मौनीने हा सीन शूट करण्यास नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकेशनवर मीडियाच्या उपस्थितीत तिला इंटिमेट सीन करण्यास असहज वाटू लागले. ही बाब तिने निर्मात्यांना सांगितली. मी हा सीन तेव्हाच करू शके ल जेव्हा मीडियाचे लोक सेटवर नसतील. निर्मात्यांनी तिची ही मागणी मान्य केली व मीडियाच्या लोकांना सेट सोडण्याची विनंती केली. आता मौनीने केलेला इंटिमेट सिन कसा असेल हे तर टीव्हीवर ‘नागिन २’ ही मालिका पाहुनच कळेल.