Join us  

"म्हणून मला चरित्रहीन समजले गेले", राखी सावंतचा तो व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या डोळ्यात तरळले अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 1:25 PM

Rakhi Sawant fans becomes emotional. बिग बॉस १४' मध्ये राखी सावंतने साऱ्यांचे भरभरून मनोरंजन केले. राखी सावंत मुळेच बिग बॉस १४ ला विशेष पसंती मिळाली. राखी सावंतने घरात तिचा आयुष्याशी निगडीत अनेक किस्से जगासमोर आणले. राखीचा घराठी महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं.त्यांना त्यांची मतं मांडण्याचा देखील अधिकार नव्हता.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी  सावंत आपल्या चित्रविचित्र आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असते. अनेकदा तिला तिच्या वक्तव्यांमुळं ट्रोल देखील केलं जात. मात्र कधी कधी माराठीमुलगी राखी साऱ्यांना भावूक ही करून जाते.

'बिग बॉस १४' मध्ये राखी सावंतने साऱ्यांचे भरभरून मनोरंजन केले. राखी सावंत मुळेच बिग बॉस १४ ला विशेष पसंती मिळाली. राखी सावंतने घरात तिचा आयुष्याशी निगडीत अनेक किस्से जगासमोर आणले. राखीचा घराठी महिलांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं.त्यांना त्यांची मतं मांडण्याचा देखील अधिकार नव्हता.

अशा परिस्थितमध्ये राखीने साऱ्या सीमा तोडत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. जेव्हा राखी साठी लग्नासाठी स्थळ शोधायची वेळ आली, तेव्हा मात्र अनेकांनी तिला नापसंती दिलीं. बॉलिवूड मध्ये काम करते, डान्स करते, तिचे चारित्र्य चांगले नसणार म्हणून आलेली स्थळ नकार द्यायची...राखी सावंत या सगळ्या गोष्टी राहुल वैदयला सांगत असताना भावूक झाल्याचे ही पाहायला मिळालं. राखीचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा जोरदार व्हायरल झाला आहे.

खरंतर सुरुवातीपासूनच राखीच्या वाट्याला संघर्ष आला आहे.लहान वयातच घराची आर्थिक जबाबदारी तिला सांभाळावी लागली. वयाच्या १३ वर्षी पेन कंपनीत काम करुन ती घराचा खर्च भागवायची.

टीना अंबानी यांच्या लग्नात तिला ५० रुपये टीप मिळाली होती हा अनुभव अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितला होता.

मात्र बॉलिवूडमध्ये अभिनेत्री बनण्याची इच्छा तिला स्वस्त बसू देत नव्हती.आज मेहनतीच्या जोरावर तिने स्वतः ला सिद्ध केले आहे. "राखी सावंत बस नाम ही काफी है..." कारण आज तिचे लाखोंच्या संख्येत फॅन्स आहेत.

टॅग्स :राखी सावंतबिग बॉस १४