Join us  

स्नेहा म्हणते, जागरानी देवीची भूमिका साकारताना मी अनेक गोष्टी शिकतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 10:14 AM

स्टार भारतवरील नवीन शो चंद्रशेखरचे कॉन्टेन्ट चांगले असून अभिनेत्यांचे प्रदर्शनही खरेखुरे वाटत आहे. हा शो खूप   संशोधनानंतर आणि चंद्रशेखर ...

स्टार भारतवरील नवीन शो चंद्रशेखरचे कॉन्टेन्ट चांगले असून अभिनेत्यांचे प्रदर्शनही खरेखुरे वाटत आहे. हा शो खूप   संशोधनानंतर आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आयुष्यातील सत्यगोष्टींना लक्षात ठेवून बनवण्यात आला आहे. इतिहासाला परत आणण्यासाठी ह्या शोच्या निर्मात्यांनी ह्या शो त्या काळात परत नेले आहे जेव्हा वीज नव्हती आणि पाण्याचा स्त्रोत केवळ विहिर होती. रात्रीच्या दृश्यांसाठी ते मेणबत्तीच्या प्रकाशात चित्रीकरण करत आहेत. आजच्या काळात जगण्यासाठी एसीची नितांत गरज भासत असताना ह्या शोमधील कलाकार खूप खडतर प्रयत्न करत आहेत. सेटवरील घरे मातीची बनली असून ते खऱ्याखुऱ्या ठिकाणी चित्रीकरण करत आहेत.जागरानी देवीची भूमिका करणारी स्नेहा वाघ म्हणाली, “शो च्या निर्मात्यांनी ह्या शो ला चंद्रशेखर आझाद यांच्या काळातील दाखवण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करत आहेत. दररोज आम्ही वेगवेगळ्‌या परिस्थितीमध्ये चित्रीकरण करतो. त्यामुळे आमचे पाय जमिनीवर राहतात आणि आपल्याकडे जे काही आहे त्यापेक्षा कमी गोष्टींमध्ये आनंदी राहण्याची शिकवण आम्हांला मिळते.”'चंद्रशेखर आझाद' या क्रांतिकारकाच्या बालपणीच्या भूमिकेत अयान झुबेर रेहमानी झळकणार आहे.त्याची आई जाग्राणीदेवी आणि वडील सीताराम तिवारी यांच्या भूमिका अनुक्रमे स्नेहा वाघ आणि सत्यजित शर्मा उभ्या करणार आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेत चंद्रशेखर यांच्या आईची भूमिका रंगविणारी अभिनेत्री स्नेहा वाघ हिला सेटवर स्वत:बद्दल कमीपणा वाटू लागला आहे. स्नेहा वाघने आतापर्यंत अनेक मालिकांतून आईची भूमिका प्रभावीपणे रंगविली असली,तरी या मालिकेत सर्व कथा बालकलाकारांभोवती असल्याने तिच्या मनात आपण इतके महत्त्वाचे नाही.अशी भावना निर्माण झाली आहे.