Join us  

 सिद्धार्थ शुक्लानं पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 11:31 AM

इम्रान खान काय म्हणालेत? बलात्काराच्या घटनांवरून इम्रान खान यांनी अलीकडे अकलेचे तारे तोडले होते.

ठळक मुद्देप्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो.अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते.

बिग बॉस 13 चा विजेता व अभिनेता सिद्धार्थ शुक्ला  (Sidharth Shukla)  त्याच्या परखड स्वभावासाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह असलेला सिद्धार्थ सध्या चर्चेत आहे तो त्याच्या एका ट्विटमुळे. आपल्या या ट्विटमधून सिद्धार्थने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान ( Imran Khan) खान यांना चांगलेच सुनावले. (Sidharth Shukla has a strong reaction to Pakistan PM Imran Khan's comment on rising rape cases)बलात्काराच्या वाढत्या घटनांवरून इम्रान खान यांनी अलीकडे अकलेचे तारे तोडले होते. बलात्कारांच्या घटनांना अश्लिलता, पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृती जबाबदार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो.अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असे ते म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावरून सिद्धार्थ शुक्लाने त्यांना चांगलेच सुनावले.

‘वाह रे वाह दुनिया वालो...मग तर अशा प्रकरणात ज्या पुरूषांकडे संयम नाही म्हणता, त्यांना नपुंसक बनवले पाहिजे,’ असे ट्विट सिद्धार्थ शुक्लाने केले. सिद्धार्थच्या या ट्विटवर सोशल मीडिया युजर्सनी असंख्य प्रतिक्रिया दिल्या.

इम्रान खान यांच्या एका समर्थकाने यानिमित्ताने सिद्धार्थला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला. इम्रान यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे या समर्थकाने लिहिले. सिद्धार्थने या समर्थकालाही फैलावर घेतले. ‘अरे भावा, त्यांनी तसे म्हटले नसेल तर मग त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सवर मानहानी दावा ठोकायला हवा. कारण शेवटी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, हो ना?,’ असे सिद्धार्थने लिहिले.

इम्रान खान काय म्हणालेत?पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी 2 तास नागरिकांशी फोनवर चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली होती. या दरम्यान एका नागरिकाने त्यांना सरकार बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषणाच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे असा प्रश्न विचारला होता. यावर इम्रान खान यांनी या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध केला.  लैंगिक शोषण  अश्लीलतेमुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते. प्रत्येक पुरूषाकडे इतका संयम नसतो.अश्लिलता वाढत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असे ते म्हणाले होते. यानंतर त्यांनी धर्मावर मत मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणे महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले होते.  यामुळे  प्रलोभनाला नियंत्रित करता येते असा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाइम्रान खान