Join us  

मला माफ कर भावा...; एजाज खाननं का मागितली सिद्धार्थ शुक्लाची माफी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 12:31 PM

एजाजला होतोय या गोष्टीचा पश्चाताप, शेअर केली भावुक पोस्ट

ठळक मुद्देएजाजने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केलीये.

बिग बॉस 13’ चा  (Bigg Boss 13)  विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या अकाली निधनानं टीव्ही इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जातेय. सिद्धार्थ आज आपल्यात नाही,यावर आजही अनेकांचा विश्वास बसत नाहीये. अनेक टीव्ही सेलिब्रिटी सिद्धार्थबद्दल बोलताना भावुक झालेत. ‘बिग बॉस 14’फेम एजाज खान (Eijaz Khan) यानेही सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला. केवळ शोक नाही तर त्याने सिद्धार्थची मोठ्या मनानं माफीही मागितली.एजाजने इन्स्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केलीये.

यात तो लिहितो, ‘मी टोकन गेश्चरवर विश्वास ठेवत नाही. मला तुझ्याशी बोलायंच होतं, पण आता मी तुझ्याशी कधीच बोलू शकणार नाही. सर्वप्रथम मी तुझी माफी मागू इच्छितो. मी तुला फोन करण्याचा वा भेटण्याचा प्रयत्न केला नाही. काय कारण होतं माहित नाही. कदाचित मी माझ्या कामात व्यग्र होतो. आपण कुठं ना कुठं भेटूच, असं मला वाटलं होतं. पण आपली भेट झालीच नाही. यासाठी मी स्वत:ला कसं माफ करेल, माहित नाही. मला माफ कर भावा. बिग बॉसच्या घरात मी तुझ्या प्रेमात पडलो होतो. मी आयुष्यात इतक्या जवळून कोणालाही बघितलं नव्हतं. बिग बॉसच्या घरात केवळ तुच्यासाठीच मी चांगला होता. तुझी तत्त्व, तुझं थेट बोलणं, प्रत्येक गोष्टीवर ठाम राहणं... जिंकेपर्यंत तू हार मानायचा नाहीस. तू तुझ्या अटींवर जगलास. या जगात खंबीर असणं किती गरजेचं आहे, हे तू मला सांगितलं होतंस. मी सुद्धा तुझ्यासारखं बनायचा प्रयत्न करतोय. मला सल्ला देण्यासाठी तुझे आभार. तुला सलाद आणि प्रोटीन शेक किती आवडायचं, मला ठाऊक आहे. तू कसं वर्कआऊट करायचास, तुझं आवडतं गाणं, हे सगळं मला ठाऊक आहे. माझ्या कुटुंबापेक्षा तू माझ्या जवळचा झाला होता. तू शानदार व्यक्ती होतास. माझी प्रेरणा होतास. तू सांगितलेल्या गोष्टी मला प्रोत्साहित करतात. मला तुझ्या आयुष्याचा भाग बनवल्याबद्दल आभार. आत्ता नाही तर कधीतरी तुझी माझी भेट नक्की होईल,’ असं एजाजने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

टॅग्स :सिद्धार्थ शुक्लाबिग बॉस