Join us  

श्वेता तिवारीचा पहिला पती होता अभिनेता, दारूच्या नशेत तिला करायचा मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 1:05 PM

श्वेताचा पहिला पती देखील तिला मारहाण करत असल्याने तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला होता. श्वेताचा पहिला पती हा अभिनेता असून तो बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमात देखील झळकला होता. 

ठळक मुद्देराजा आणि श्वेताचे लग्न १९९९ मध्ये झाले होते. त्यावेळी श्वेता केवळ १९ वर्षांची होती. राजाची चुलत बहीण आणि श्वेता या चांगल्या फ्रेंड्स होत्या. राजाच्या बहिणीमुळेच श्वेता आणि राजाची ओळख झाली आणि ते काहीच दिवसांत एकमेकांच्या प्रेमात पडले.

‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत साकारलेल्या प्रेरणाच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्वेता तिवारी सध्या लाइमलाईटपासून दूर आहे. पण आपल्या पर्सनल आयुष्यामुळे ती सतत चर्चेत असते. तूर्तास श्वेताने पती अभिनव कोहली याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला आहे. अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. श्वेताचा पहिला पती देखील तिला मारहाण करत असल्याने तिने नवऱ्यासोबत घटस्फोट घेतला होता. श्वेताचा पहिला पती हा अभिनेता असून तो बिग बॉस या वादग्रस्त कार्यक्रमात देखील झळकला होता. 

श्वेता तिवारीचे पहिले लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. त्याने दाल में कुछ काला है या चित्रपटात काम केले होते. तसेच तो अदालत, तेनाली रामा, कहानी चंद्रकांता की यांसारख्या कार्यक्रमात झळकला आहे. बिग बॉस या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनमध्ये तो दिसला होता. या कार्यक्रमामुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

राजा नच बलिये या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनला त्याची पत्नी श्वेतासोबत थिरकला होता. राजा श्वेताला मारायचा असा श्वेताने त्याच्यावर आरोप लावला होता. राजाच्या या वागणुकीला कंटाळून २००७ मध्ये श्वेता त्याच्या पासून वेगळी झाली होती. त्यांनी त्यानंतर २०१२ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर राजाने २०१५ मध्ये श्वेता सूद या कॉर्पोरेट जगतातील एका महिलेसोबत लग्न केले. 

राजा आणि श्वेताचे लग्न १९९९ मध्ये झाले होते. त्यावेळी श्वेता केवळ १९ वर्षांची होती. राजाची चुलत बहीण आणि श्वेता या चांगल्या फ्रेंड्स होत्या. राजाच्या बहिणीमुळेच श्वेता आणि राजाची ओळख झाली आणि ते काहीच दिवसांत एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी केवळ तीन महिन्यांच्या नात्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. या लग्नाला श्वेताच्या आईचा विरोध होता. राजा हा श्वेतासाठी योग्य नाही असे त्यांचे म्हणणे होते. पण तरीही श्वेता तिच्या मतावर ठाम होती. श्वेता आणि राजा यांना पलक ही मुलगी असून ती श्वेतासोबत राहाते. 

 

टॅग्स :श्वेता तिवारी