Join us  

Shocking! केबीसीच्या नावाखाली पाकिस्तानमधून सुरू होती फसवणूक, टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 11:23 AM

केबीसीच्या लोकप्रियतेचा गैरवापर पाकिस्तानमधून केला गेल्याचे समोर आले आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी सिनेमासोबतच छोट्या पडद्यावरदेखील आपली छाप उमटविली आहे. छोट्या पडद्यावरील क्वीझ शो कौन बनेगा करोडपतीची लोकप्रियतता तर सगळ्यांनाच माहित आहे. जेव्हा केव्हा हा शो टीव्हीवर प्रसारीत व्हायचा तेव्हा प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळते. मात्र आता असं चित्र समोर आलं आहे ज्यात लोकप्रियतेचा गैरवापर केला आहे. कंटेस्टंट्सना पैसे आणि शोमध्ये एन्ट्री देतो असं सांगून फसविले जाते. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे.

अभिनेते अमिताभ बच्चन यांचा शो कौन बनेगा करोडपतीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड दिल्ली पोलिसांनी केला आहे. या टोळीचा हा अड्डा दिल्ली किंवा भारतातून चालवला जात नसून पाकिस्तानातून चालवला जात होता. दिल्ली पोलिस सायबर सेलने या टोळीतल्या तीन लोकांना अटक केली आहे. आरोपींची चौकशी केली जात आहे.

दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी आईएएनएसला सांगितले की, हे पहिल्यांदा घडलेले नाही. जेव्हा केबीसीच्या नावावर फसवणूक करणाऱ्या टोळीला पकडले आहे. देशात यापूर्वीदेखील कौन बनेगा करोडपतीच्या नावावर बरीच फसवणूक होत असते. शोमध्ये सहभागी करण्यासाठी लोकांकडून जास्त पैसे घेतल्याचे समोर आले आहे.

पोलिसांच्या अनुसार, ही पहिली संधी आहे जिथे टोळीने केबीसीच्या नावावर फसवणूक करण्यासाठी पाकिस्तानमध्ये अड्डा बनवला आहे. पाकिस्तानमधून सुरू असलेल्या या टोळीचा भांडाफोड दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्हे नियंत्रण शाखेने केला आहे. आता या टोळीवर काय कारवाई करतात हे पहावे लागेल.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीगुन्हेगारी