Join us

Shocking : बंदगी कालराचा रोमान्स बघून घरमालकाने तिच्या आई-वडिलांना काढले घराबाहेर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 17:35 IST

बिग बॉस हा एक असा रिअ‍ॅलिटी शो आहे, ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धक आपल्या आपल्या माइंड लेव्हलनुसार हा गेम खेळतो. मात्र ...

बिग बॉस हा एक असा रिअ‍ॅलिटी शो आहे, ज्यामध्ये प्रत्येक स्पर्धक आपल्या आपल्या माइंड लेव्हलनुसार हा गेम खेळतो. मात्र यंदाचा सिजन खूपच खालच्या स्तरावर खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. होय, घरात स्पर्धक म्हणून असलेले पुनीश शर्मा आणि बंदगी कालरा हे दोघे ज्या पद्धतीने अश्लीलपणा करीत आहेत, त्यावरून हा शो परिवाराने बघू नये असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. कारण ज्या पद्धतीने बंदगी आणि पुनीश कुठलीही परवा न करता घरात खुल्लम खुल्ला अश्लीलपणा करीत आहेत, त्यावरून बाहेरच्या दुनियेत एकच खळबळ उडाली आहे. आता तर अशी बातमी समोर येत आहे की, बंदगीचा हा खुल्लम खुल्ला प्यार बघून तिच्या वडिलांची प्रकृती खालावली आहे. ्रकाही दिवसांपूर्वीच बंदगी आणि पुनीश एका बेडवर रोमान्स करताना बघावयास मिळाले होते. त्यानंतर एका व्हिडीओमध्ये पुनीश चक्क बंदगीला कपडे काढण्यासाठी सांगताना दिसत आहे. एवढेच काय तर गेल्या आठवड्यात दोघे वॉश रूममध्ये टाइम स्पेंट करताना दिसून आले. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ‘मुलगी बंदगीचा हा सर्व तमाशा बघून तिच्या वडिलांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. बंदगी आणि पुनीशचे हे कारनामे बघून त्यांचे ब्लडप्रेशर वाढले आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे. वडिलांची प्रकृती बिघडण्यास बंदगीलाच जबाबदार धरले जात आहे.  एका रिपोर्टनुसार बंदगीचे आई-वडील मुंबईमधील ज्या घरात राहतात, त्या घराच्या मालकाने मुलीचे असे कारनामे बघून त्यांना घराबाहेर काढले आहे. बंदगी आणि पुनीशला यासर्व घटनांविषयी माहिती नसले तरी, त्यांचा रोमान्स बघून आता प्रेक्षकांनाही तिटकारा आला आहे. पुनीश आणि बंदगीची केमिस्ट्री रंगल्याने दोघांमध्ये खूपच अश्लीलपणा दाखविला जात आहे. सुरुवातीला दोघांमधील रिलेशनशिप फेक असल्याचे बोलले जात होते. परंतु ज्या पद्धतीने दोघे एकमेकांबरोबर वागत आहेत, त्यावरून प्रेक्षकांना त्यांच्यात नक्कीच काहीतरी असावे असे दिसून येत आहे. बºयाचदा तर असेही दिसून आले की, पुनीश मध्यरात्री बंदगीच्या बेडवर दिसून आला आहे.