Join us  

शिवांगी जोशीने दिल्या 'या' अभिनेत्रीला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 4:49 PM

‘स्टार प्लस’वर ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या

स्टार प्लस’वरये रिश्ता क्या कहलाता है’ ही मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. याच मालिकेच्या कथानकावर आधारित एक नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरील अनेक प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच या मालिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मिष्टी या नायिकेची भूमिका रिहा शर्मा साकारणार आहे. तिची ओळख ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेत नायराकडून (शिवांगी जोशी) करून दिली जाईल. 

यासंदर्भात शिवांगी सांगते, “या वाहिनीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेतील मध्यवर्ती भूमिकेने टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात माझं विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेत मला नायरा ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारण्यास मिळाली. पण ही केवळ एक व्यक्तिरेखा राहिलेली नाही. नायराचं नाव आज प्रत्येकाच्या तोंडी झालं. प्रेक्षकांनी नायराच्या भूमिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि इतक्या वर्षांनंतरही त्यांचं नायरावरील प्रेम जराही कमी झालेलं नाही, याबद्दल मी त्यांची आभारी आहे. आता नायराचं हे सुदैव आणि परंपरा तिच्या मिष्टी या बहिणीकडे सोपविताना मला अतिशय आनंद होत आहे. मिष्टीला तिच्या या नव्या प्रवासाच्या शुभेच्छा. आता प्रेक्षकांनी नायरावर जसं प्रेम केलं, तसंच ते मिष्टीवरही प्रेम करतील, अशी मला आशा आहे.”

आपल्या मिष्टी या नव्या भूमिकेवर उत्सुक झालेल्या रिहाने सांगितले, “या मालिकेचा लोकप्रियतेचा इतिहास, त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा, साधी, तरीही मनाची पकड घेणारी पटकथा आणि अप्रतिमक कामगिरी यामुळे मला या मालिकेत एक भूमिका रंगविण्यास मिळत असल्याचा खूपच आनंद होत आहे. मला नेहमीच वेगवेगळ्या भूमिका रंगविण्यास आवडतात आणि मी आजवर साकारलेल्या सर्व भूमिकांपेक्षा मिष्टीची भूमिका अगदीच भिन्न आहे. अशी ही एकमेव व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला मिळत असल्याबद्दल मी स्वत:ला फार सुदैवी समजते. आता ही भूमिका प्रेक्षकांनाही आवडेल, अशी अपेक्षा करते.”

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस