Join us  

Bigg Boss 16 Grand Finale : “तो हा खेळ खेळला नाही तर…”, फिनालेपूर्वी शिव ठाकरेचा व्हिडीओ व्हायरल, खास आहे कॅप्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 6:37 PM

Bigg Boss 16 Grand Finale, Shiv Thakare : शिव ठाकरेच्या अकाउंटवरून केली गेलेली पोस्ट तुफान चर्चेत आहे. आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेपूर्वी त्याच्या टीमने शिवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Bigg Boss 16 Grand Finale: अखेर ‘बिग बॉस’ प्रेमींना ज्या क्षणाची प्रतीक्षा हाेती, तो क्षण आलाय. काहीच तासांत ‘बिग बॉस १६’चा विजेता कोण हे ठरणार आहे. शिव ठाकरे, प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस पाहायला मिळतेय. अर्थात सोशल मीडियाचा कल जाणून घेतला असता प्रियंकाचं पारडं जड दिसतंय. ताज्या वोटिंग ट्रेंडनुसार प्रियंका या सीझनची विजेती असणार आहे तर शिव ठाकरे (Shiv Thakare) शोचा फर्स्ट रनर-अप असेल. अर्थात विनर कोण असणार, हे  अवघ्या काही तासांत कळणार आहे. तूर्तास  शिव ठाकरेच्या अकाउंटवरून केली गेलेली पोस्ट तुफान चर्चेत आहे. आज रंगणाऱ्या ग्रँड फिनालेपूर्वी त्याच्या टीमने शिवचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओचं कॅप्शनही खास आहे.

“शिव हा खेळ फक्त खेळला नाहीये तर त्याच्या खऱ्या भावना, त्याचा स्वभाव, त्याची मैत्री, त्याच्यातील नेतृत्वगुण, त्यातला खरेपणा दाखवत तो हा खेळ जगला आहे. या कार्यक्रमातील त्याचा प्रवास एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. शिवने ते सगळं केलं आहे जे एखाद्या सुपरहिट चित्रपटांमध्ये असतं. आता जेव्हा जेव्हा जेव्हा ‘बिग बॉस १६’चं नाव घेतलं जाईल तेव्हा तेव्हा शिव मनोहरराव उत्तमराव झिंगुजी गणूजी ठाकरे हे नावही घेतलं जाईल.” असं कॅप्शन असलेली ही पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसतेय.   

शिवने करिअरच्या सुरुवातीला डान्स कोरिओग्राफी, इव्हेंट मॅनेजमेंट केलं. वडिलांच्या पानाच्या दुकानातही तो बसायचा. बहिणीसोबत त्याने वर्तमानपत्र विकली, दुधाची पाकिटंही विकली. बिग बॉस मराठीच्या सीझन २ चा विजेता ठरला आणि हा मराठमोळा मुलगा पहिल्यांदा सर्वांच्या डोळ्यांत होता. शिव ठाकरे पहिल्यांदा रोडीजमध्ये दिसला होता. रोडीजनंतर, शिव ठाकरे मराठी बिग बॉसमध्ये सामील झाला आणि त्या शोचा विजेता ठरला. शिवचा जन्म ९ सप्टेंबर १९८९ रोजी अमरावतीत झाला. शिवने आपले प्रारंभिक शिक्षण अमरावती येथून केलं. नागपूरच्या महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. शिवने वडिलांच्या आनंदासाठी इंजिनीअरिंग केलं, पण त्याला नेहमीच अभिनेता व्हायचं होतं.

टॅग्स :बिग बॉसशीव ठाकरे