...आता संजय कोहलीने शिल्पा शिंदेवर केला मानहानीचा दावा दाखल!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2017 18:38 IST
‘भाभीजी घर पर है’ मालिका फेम शिल्पा शिंदे सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने प्रोड्यूसर संजय कोहलीच्या ...
...आता संजय कोहलीने शिल्पा शिंदेवर केला मानहानीचा दावा दाखल!!
‘भाभीजी घर पर है’ मालिका फेम शिल्पा शिंदे सध्या भलत्याच कारणाने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने प्रोड्यूसर संजय कोहलीच्या विरोधात लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र आता संजय कोहली आणि त्यांची पत्नी बिनायफर हिने शिल्पाच्या विरोधात बदनामी तथा मानहानीचा गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे. शिल्पाने संजयवर आरोप करताना म्हटले होते की, संजयने मला मालिकेत कायम ठेवण्यासाठी सेक्सची डिमांड केली होती. तो मला नेहमीच हॉट आणि सेक्सी म्हणत होता. तो माझ्याशी इंटिमेंट होऊ इच्छित होता. बºयाचदा तो बळजबरीने गळ्यात पडायचा तसेच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. एकदा तर संजयने मला त्याची सेक्शुअल आॅफर मान्य न केल्यास शोमधून हकालपट्टी करणार असल्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. याशिवाय टाइम्स आॅफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तर माझ्याकडे याबाबतचे पुरेसे पुरावे असल्याचे शिल्पाने म्हटले होते. यावेळी शिल्पाने आयएफटीपीसी (इंडियान फिल्म अॅण्ड टीव्ही प्र्रोड्यूसर्स काउंसिल), सिन्टा (सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) आणि एफडब्ल्यूआयसीई (फेडरेशन आॅफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयिज) यांच्याविरोधातही मानहानीचा दावा दाखल केला होता. शिल्पाच्या या दाव्यानंतर आयएफपीटीसीने म्हटले होते की, शिल्पावर आम्ही बॅन आणले नाही, तर आम्ही तिच्यावर केलेल्या कारवाईचे तिला स्पष्टीकरण हवे होते. शिल्पा जवळपास दीड वर्ष ‘भाभीजी घर पर है’ या मालिकेत भाभीजीच्या मुख्य भूमिकेत होती. या मालिकेमुळेच तिला ओळख मिळाली. आता शिल्पावर संजय आणि त्याच्या पत्नीने दावा दाखल केल्याने नेमकी कोणाच्या अडचणीत वाढ झाली हे येत्या काळात स्पष्ट होईलच.