शिल्पा शेट्टी आहे खुदा बख्शची फॅन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 15:26 IST
इंडियन आयडलमध्ये आता शेवटचे पाच स्पधक शिल्लक असून स्पर्धा आता अधिक चुरशीची बनली आहे. या सगळ्या स्पर्धकांमध्ये कोण बाजी ...
शिल्पा शेट्टी आहे खुदा बख्शची फॅन
इंडियन आयडलमध्ये आता शेवटचे पाच स्पधक शिल्लक असून स्पर्धा आता अधिक चुरशीची बनली आहे. या सगळ्या स्पर्धकांमध्ये कोण बाजी मारेल याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. इंडियन आयडल 9 मधील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज एकाहून एक सरस आहेत. यातील खुदा बख्शचा तर आवाज सगळ्यांनाच खूप आवडतो. खुदा बख्श हा केवळ वीस वर्षांचा असून त्याच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे. तो इंडियन आयडलमध्ये प्रेक्षकांना नेहमीच स्टायलिश लूकमध्ये पाहायला मिळतो. खुदा बख्श कार्यक्रमात नेहमीच पारंपरिक कपडे घालतो. पण या कार्यक्रमात नुकताच त्याने सुट परिधान केला होता. त्याच्या या लूकचे सगळ्यांनीच खूप कौतुक केले. तो या लूकमध्ये खूपच छान दिसत असल्याचे सगळ्यांचे म्हणणे होते. फराह खान तर त्याला या वेगळ्या लूकमध्ये पाहून खूपच खूश झाली होती. खुदा बख्श हा त्याच्या खऱ्या आयुष्यात खूप लाजराबुजरा आहे. पण एकदा तो मंचावर आला की, त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमतो. गाताना तो अंतर्बाह्य पूर्णपणे बदलून जातो. त्याच्या आवाजाचे सध्या अनेक चाहते आहेत. पण त्याचसोबत एक सेलिब्रेटीदेखील त्याची चाहती आहे आणि ही गोष्ट त्याला नुकतीच कळली आहे. या कार्यक्रमाची परीक्षक फराह खानने कार्यक्रमात ही सगळ्यांना गोष्ट सांगितली. शिल्पा शेट्टी कुंद्रा खुदा बख्शची मोठी फॅन असून ती त्याचा प्रत्येक परफॉर्मन्स न चुकता पाहते. त्याचसोबत प्रत्येक भागानंतर ती फराह खानला फोन करून खुदा बख्श किती छान गायला हे सांगते. शिल्पा शेट्टी आपली फॅन असल्याचे ऐकून सध्या खुदा बख्श खूपच खूश आहे.