Join us

लिप सिंग बॅटल मध्ये शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने केला झिंगाट डान्स !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 14:00 IST

निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या स्टार प्लस वर ‘लिप सिंग बॅटल’ हा रिएलिटी शो होस्ट करतेय. ह्या शोसाठी बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या ...

निर्माती-दिग्दर्शक फराह खान सध्या स्टार प्लस वर ‘लिप सिंग बॅटल’ हा रिएलिटी शो होस्ट करतेय. ह्या शोसाठी बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या सेलिब्रिटींची हजेरी शोवर लागलेली आहे. नुकतीच ह्या आगळ्या-वेगळ्या रिएलिटी शोवर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि रितेश देशमुखने हजेरी लावली होती. इथे येऊऩ शिल्पा आणि रितेशने आपल्या खास अंदाजात झिंगाट डान्स करून खूप धमाल उडवली. आणि शो अधिकच मनोरंजक झाला.शोमधल्या सूत्रांनुसार, झिंगाट गाण्यावर डान्स केल्यावर रितेश देशमुखने लिप सिंग बॅटलचं चॅलेंज घेत, मिथुन चक्रवर्तींच्या ‘जीते हम शान से’ चित्रपटातल्या ‘जुली जुली’ गाण्यावर परफॉर्मन्स दिला. मिथुनदाच्या गेटअपमध्ये मिथुनदा स्टाइलमध्ये परफॉर्म करून रितेशने प्रेक्षकांची मनं जिंकली.एवढंच नाही, तर शिल्पा शेट्टीनेही लिप सिंग बॅटलचे चॅलेंज घेत, अमिताभ बच्चन ह्यांचा गेटअप केला. आणि बिग बींच्या ‘हम’ चित्रपटातल्या लोकप्रिय ‘जुम्मा चुम्मा दे दे’ ह्या गाण्यावर परफॉर्म केले. शिल्पा शेट्टी महानायक अमिताभ बच्चन स्टाइलमध्ये डान्स करत असतानाच फराह खान बनली किमी काटकर. आणि दोघींनी मिळून ह्या ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यावर परफॉर्म करून धमाल उडवून दिली. त्यामुळेच आता हा शो जेव्हा टीव्ही वर प्रेक्षिपत होईल, तेव्हा नक्कीच लोकांना हा शो पाहताना खूप मजा येईलं.  लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात प्रेक्षकांना प्रत्येक भागात बॉलिवूडमधील आजचे आघाडीचे कलाकार पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमात रवीना टंडन, आयुषमान खुराणा, फरहान अख्तर यांसारख्या बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली आहे. लिप सिंग बॅटल या या कार्यक्रमात नुकतीच बॉलिवूडमधील एक आघाडीची अभिनेत्री आली होती. तिने अमिताभ बच्चन यांच्या एका गाण्यावर नृत्य सादर केले.अभिनेत्री शिल्पा शेट्टीने या कार्यक्रमातील आपला परफॉर्मन्सच अमिताभ बच्चन यांना समर्पित केला. अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील गाण्यावर नृत्य करण्यासाठी तिने तिचा मेकअप पूर्णपणे अमिताभ बच्चन यांच्यासारखाच केला होता.शिल्पा ही अमिताभ बच्चन यांची खूप मोठी फॅन आहे आणि त्यामुळे तिने लिप सिंग बॅटल या कार्यक्रमातील तिचे नृत्य त्यांना समर्पित करण्याचे ठरवले आणि तिने हम या त्यांच्या चित्रपटातील जुम्मा चुम्मा दे दे या गाण्यावर परफॉर्मन्स सादर केला.Also Read:ओळखा पाहू कोण आहे ही फराह खानसोबत नाचणारी आजची बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री?