Join us  

OMG! केवळ आजारपणामुळे या बालकलाकाराला काढून टाकले मालिकेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 7:40 PM

एका बालकलाकाराला त्याच्या आजारपणामुळे मालिकेतून काढण्यात आल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

ठळक मुद्देये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत शौर्य शहा हा बालकलाकार कैरव ही भूमिका साकारत आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याला मालिकेतून काढण्यात आले असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. 

ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून या मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना लागलेली असते. पण आता ही मालिका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. या मालिकेतील एका बालकलाकाराला केवळ त्याच्या आजारपणामुळे मालिकेतून काढण्यात आलेले आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेत शौर्य शहा हा बालकलाकार कैरव ही भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. शौर्य सेटवर प्रचंड नखरे करत असल्याने त्याला या मालिकेतून काढण्यात आले असल्याचे म्हटले जात होते. पण शौर्यच्या आईने एक वेगळेच कारण सांगितले आहे. तो गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्याला मालिकेतून काढण्यात आले असे त्याच्या आईचे म्हणणे आहे. 

स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आईने सांगितले आहे की, शौर्यला चित्रीकरणासाठी बोलावण्यात आले होते. पण त्याची तब्येत खूपच खराब असल्याने त्याला चित्रीकरणाला येणे शक्य होणार नाही असे आम्ही मालिकेच्या टीमला कळवले. पण ते सतत आग्रह करत असल्याने आमच्यात यावरून खूप वेळ चर्चा झाली आणि अखेर आम्ही त्याला चित्रीकरणासाठी घेऊन गेलो. पण तिथे गेल्यावर त्याची तब्येत खूपच खालवल्याने तो दोन तासांहून अधिक काळ चित्रीकरण करू शकला नाही. त्यामुळे आम्ही त्याला घरी परत घेऊन आलो. या मालिकेतील त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने त्याला दिवसाला आठ-दहा तास चित्रीकरण करणे गरजेचे होते. पण शौर्यला सध्याच्या स्थितीत ते शक्य नसल्याने मालिकेच्या टीमने त्याला रिप्लेस केले. 

शौर्यने मालिका सोडल्यानंतर त्याच्या आईने इन्स्टाग्रामला व्हिडिओ शेअर करून त्याच्या मालिका सोडण्याविषयी सांगितले होते. पण प्रोडक्शन हाऊसने हा व्हिडिओ त्यांना डीलिट करायला लावला. शौर्यची रिप्लेसमेंट मालिकेत दाखवण्याआधी त्याने ही मालिका सोडली ही बातमी लोकांपर्यंत पोहोचू नये अशी त्यांची त्यामागचे कारण होते. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता है