Join us

शशांक केतकर आणि शर्मिष्ठाची 'या' कारणामुळे जमली गट्टी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 16:33 IST

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत

ठळक मुद्देया मालिकेमधून शर्मिष्ठा आणि शशांक केतकर देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आले प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाच नातं देखील खूप आवडत आहे

कलर्स मराठीवरील सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेद्वारे शशांक आणि मृणाल पहिल्यांदाच एकत्र मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ही जोडी प्रेक्षकांच्या बरीच पसंतीस पडत आहे. इतकेच नसून या मालिकेमधून शर्मिष्ठा आणि शशांक केतकर देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि प्रेक्षकांना या दोघांमधील बहीण भावाच नातं देखील खूप आवडत आहे. सिड आणि संयु यांच्यामधील छोटी मोठी भांडण, सिडचे संयुला समजवणे, त्यांच्या धम्माल मस्ती कुठेतरी प्रेक्षकांना आवडू लागली आहे. पडद्यावरच नसून पडद्यामागे देखील यांची बरीच धम्माल मस्ती सुरु असते. मालिकेद्वारे चोवीस तासातला बराचसा वेळ एकत्र रहाता आणि त्यामुळे तुम्ही एकमेकांना खूप छान ओळखू लागता आणि त्यातून काही सुंदर नाती तयार होतात जी आयुष्यभर तशीच रहातात. 

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मधील शशांक केतकर म्हणाला, “शर्मिष्ठा आणि माझी मैत्री या मालिकेमुळे झाली. बिग बॉस मराठीमुळे मला शर्मिष्ठा कळली, खूप एनर्जेटिक आहे, बिनधास्त मुलगी आहे, ज्याच्यावर जीव लावते त्याच्यावर पूर्ण जीव लावते. एक मात्र नक्की मी तिच्या आणि ती माझ्या आवडत्या माणसांच्या यादीमध्ये आता हळूहळू येत चाललो आहे. एक गंमतीदार किस्सा झाला, शर्मिष्ठा मला म्हणाली तिने ललितला चार वेळा सिद्धार्थ अशी हाक मारली” त्यावरूनच कळत कि आमचं बॉन्डिंग किती छान झालं आहे. माझ्याबरोबरच नव्हे तर वंदना ताई सोबत देखील खूप छान नातं तिचं तयार झालं आहे. प्रेक्षक मला भेटतात तेंव्हा आवर्जून सांगतात अनु आणि सिड बरोबरच सिड – संयुचे सीन देखील छान होतात” हे ऐकून बरं वाटत. 

टॅग्स :शशांक केतकर