Join us  

'शार्क टँक इंडिया ३'मध्ये असणार १२ शार्क, अश्नीर ग्रोव्हरने उडवली खिल्ली, म्हणाला, "ही वाढलेली संख्या..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 10:57 AM

'शार्क टँक'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये तब्बल १२ शार्क असणार आहेत. यावरुन अश्नीर ग्रोव्हरने या शोची खिल्ली उडवली आहे.

टीव्हीवरील अनेक लोकप्रिय शोपैकी एक म्हणजे 'शार्क टँक'. पहिल्या पर्वापासूनच या शार्क टँकला लोकप्रियता मिळाली. दोन पर्वांच्या यशानंतर आता 'शार्क टँक ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शार्क टँक'चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदाच्या सीझनमध्ये तब्बल १२ शार्क असणार आहेत. हा प्रोमो पाहून अश्नीर ग्रोव्हरने या शोची खिल्ली उडवली आहे. 

'शार्क टँक'च्या पहिल्या सीझनमध्ये अश्नीर ग्रोव्हर शार्क होता. या शोमुळे त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. पण, दुसऱ्या सीझनमध्ये अश्नीर न दिसल्याने चाहतेही नाराज होते. आता अश्नीरने याच शोची खिल्ली उडवली आहे. 'शार्क टँक'च्या पहिल्या दोन सीझनमध्ये सहा शार्क होते. पण, यंदाच्या सीझनमध्ये तब्बल १२ शार्क असणार आहेत. यावरुन अश्नीरने शार्क टँकची खिल्ली उडवली आहे. अश्नीरने ट्वीटरवरुन 'शार्क टँक इंडिया ३'चा नवा प्रोमो शेअर केला आहे. 

"शार्क टँक ३ म्हणजे 'शार्क टँक ४'साठी शार्कची घेतलेली ऑडिशन आहे. आयुष्याची एक शिकवण आहे. आधीच सोडवलेल्या गोष्टीत बदल करून नवीन प्रॉब्लेम तयार करू नका. ही वाढलेली संख्या दर्जाही सुधारेल, अशी आशा आहे," असं अश्नीरने म्हटलं आहे. 

दरम्यान, 'शार्क टँक ३' मध्ये रितेश अग्रवाल, वरुण दुआ, दीपिंदर गोयल, अझहर इक्बाल, राधिका गुप्ता आणि रोनी स्क्रूवाला हे नवीन सहा शार्क दिसणार आहेत. याधीच्या सीझनमध्ये अनुपम मित्तल, नमिता थापर, पियुष बन्साल, विनीता सिंग, अमन गुप्ता, अमित जैन हे शार्क दिसले होते. 

टॅग्स :टिव्ही कलाकार