Join us

शंकर महादेवन यांनी गायलं स्वामी समर्थांचं 'हम गया नही जिंदा है' गाणं, चाहत्यांकडून मिळतोय प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 16:35 IST

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे भक्तीमय वातावरण असताना शंकर महादेवन यांचं 'हम गया नही जिंदा है' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. स्वामी समर्थांवर आधारित असलेलं हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं आहे.  

सध्या महाराष्ट्रात सगळीकडे भक्तीमय वातावरण असताना शंकर महादेवन यांचं 'हम गया नही जिंदा है' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. स्वामी समर्थांवर आधारित असलेलं हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालं आहे.  या गाण्याला सर्व राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाले आहेत. तर कोलकत्ता, पश्चिम बंगाल, सिक्कीम, डेहराडून, झारखंड, गोवा, पुणे, नेपाळ, मलेशिया, सॅंटियागो, थायलंड, दुबई, कॅलिफोर्निया आणि इतर अनेक देशांच्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये या गाण्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

'हम गया नही जिंदा है' स्वामी समर्थांवर आधारित हे गाणं मंदार चोळकर यांनी लिहिले आहे. तर संगीत प्रवीण कुवर यांनी दिले आहे. आणि या गाण्याचा भारदस्त आवाज पद्मश्री शंकर महादेवन यांचा आहे. सर्वोत्कृष्ट म्युझिक व्हिडिओ, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट संगीतकार, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स असे अनेक पुरस्कार "हम गया नही जिंदा है" या गाण्याने पटकावले.  हे गाणे नुकतेच गुरुवार, १४ ऑगस्ट २०२५ रोजी पॅनोरमा मराठी या संगीत वाहिनीवर प्रदर्शित झाले आहे.

हम गया नही जिंदा है हे गाणे डॉ. प्रसाद अप्पा तारकर यांनी दिग्दर्शित केले आहे. समीर गणेश भुबे यांची निर्मिती आहे आणि यात उषा नाडकर्णी, जयवंत वाडकर, मयुरी सुभानंद हे कलाकार आहेत. तर अशोक कुलकर्णी स्वामींच्या भूमिकेत आहेत. छायांकन राजा फडतरे, संपादन सौरभ नाईक, मेकअप अभय मोहिते, कॉस्च्युम डिझायनर मयुरी शुभानंद यांनी केली आहे. DI कलरिस्ट योगेश दीक्षित आहेत. आणि vfx कलाकार दिवाकर घोडके.  प्रोडक्शन सुमेध कांबळे आणि सहाय्यक सौरभ गोडसे करत आहेत. पद्मश्री शंकर महादेवन यांच्या दैवी आवाजातील हम गया नहीं जिंदा है हे गाणे प्रेक्षकांना अतिशय आवडत आहे. हे गाणे श्रवणीय आहेच पण हे पाहताना आपण भक्तीत लिन होऊन जाऊ हे नक्की.

टॅग्स :शंकर महादेवनश्री स्वामी समर्थ