Join us

शंकर जयकिशन थ्री इन वन ही मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 10:29 IST

एखादी मालिका सुरू झाल्यानंतर ती मालिका प्रेक्षकांना आवडो अथवा न आवडो ती मालिका अनेक महिने वाहिनीवर दाखवलीच जाते. कथानक ...

एखादी मालिका सुरू झाल्यानंतर ती मालिका प्रेक्षकांना आवडो अथवा न आवडो ती मालिका अनेक महिने वाहिनीवर दाखवलीच जाते. कथानक कितीही कंटाळवाणे असले तरी ही मालिका प्रेक्षकांना बघावीच लागते. पण गेल्या काही महिन्यापासून हा ट्रेंड बदलला आहे. सध्या मालिकेचा टिआरपी ढासळ्यास या मालिकेला लगेचच निरोप दिला जातो. शंकर जयकिशन थ्री इन वन ही मालिका सुरू होऊन काहीच महिने झाले आहेत. पण या मालिकेला सुरुवातीपासूनच चांगला टिआरपी मिळवता आला नाही. या मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत असल्याने या मालिकेला निरोप देण्याचे वाहिनीने ठरवले आहे. ही मालिका लवकरच संपणार असून या मालिकेची जागा पार्टनर ही नवी मालिका घेणार आहे. पार्टनर या मालिकेत जॉनी लिव्हर आणि किकू शारदा यांच्या मुख्य भूमिका आहेत.शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत केतन सिंग किशन ही व्यक्तिरेखा साकारणार होता. एका अपघातात शंकर, जय आणि किशन या तिळ्या मुलांपैकी किशन एकटाच वाचतो. त्याची आई ही विधवा असून ती अपंग असते. तसेच तिचे हृदय अतिशय कमजोर असते. त्याच्या आईला हार्ट अॅटॅक देखील येऊन गेलेले आहे. त्यामुळे तिच्या तीन मुलांपैकी दोन मुलांचे निधन झाले आहे ही गोष्ट ती सहन करू शकणार नाही याची चांगलीच कल्पना किशनला आहे. त्यामुळे किशन आपल्या दोन भावांचा मृत्यू झाला आहे ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवण्याचे ठरवतो आणि आईसमोर जय आणि शंकर या भूमिकेतही वावरतो अशी या मालिकेची कथा होती. शंकर जयकिशन थ्री इन वन या मालिकेत आसावरी जोशीने शंकर, जय आणि किशन म्हणजेच केतन सिंगच्या आईची भूमिका साकारली होती. तिने या मालिकेत अतिशय प्रेमळ आईची भूमिका साकारली होती. या मालिकेत ती पंजाबी स्त्रीची व्यक्तिरेखेत दिसली होती. तिची भूमिका एक ड्रामा क्वीन पण मनाने अत्यंत हळव्या असलेल्या स्त्रीची होती. या मालिकेत फलाक नाझ, चित्रांशी रावत, क्रितिंडा मिस्त्री, निमाई बाली, उमेश बायपेयी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. Also Read : ​जॉनी लिव्हरच्या फॅन्ससाठी खुशखबर​