Join us

मालिका जातायेत सात समुद्रापार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:10 IST

मालिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच स्विझर्लंडमध्ये करण्यात ...

मालिकांचे चित्रीकरण परदेशात होणे आता नवीन राहिलेले नाही. ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच स्विझर्लंडमध्ये करण्यात आले आणि आता साथ निभाना साथिया या मालिकेचे चित्रीकरण लवकरच अमेरिकेत होणार आहे. तसेच ब्रम्हराक्षस या मालिकेची टीम लवकरच स्विझर्लंडला चित्रीकरणासाठी जाणार असल्याचे कळतेय. साथ निभाना साथिया या मालिकेतील अतिशय महत्त्वाच्या भागांचे चित्रीकरण अमेरिकेत केले जाणार आहे. यासाठी मालिकेतील काही प्रमुख कलाकार आणि तंत्रज्ञ लवकरच अमेरिकेला रवाना होणार आहेत. तसेच ब्रम्हराक्षसमध्ये रिषभ आणि रैना हनिमूनसाठी स्विझर्लंडला जाणार असल्याचे मालिकेत दाखवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. पण स्विझर्लंडमधील चित्रीकरणाचे अद्याप काहीही ठरलेले नसल्याचे क्रिस्टिन डिसोझा आणि अहम शर्मा सांगतात.