Join us  

ह्या मालिकेतून शाहरूख खान करणार छोट्या पडद्यावर कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 1:44 PM

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की' मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देशाहरूख खान मालिकेतील पात्रांची करून देणार ओळखएरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत पार्थ समाथान अनुरागच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कसौटी जिंदगी की' मालिकेचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्माती एकता कपूरलादेखील या मालिकेत कोणतीही कसर ठेवायची नाही. या मालिकेत आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची एन्ट्री होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, शाहरूख खान 'कसौटी जिंदगी की' मालिकेत नरेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. किंग खान प्रेक्षकांना या मालिकेतील मुख्य कलाकार अनुराग व प्रेरणा यांची ओळख करून देणार आहे. या मालिकेच्या तीन भागांसाठी शाहरूख खान नरेटर असणार आहे. खरेतर शाहरुख आणि स्टार इंडिया यांच्यात झालेल्या करारामुळे शाहरुख या मालिकेचा एक भाग झाला आहे.

'कसौटी जिंदगी की' या मालिकेमध्ये एरिका फर्नांडिस प्रेरणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर पार्थ समाथान हा अनुरागची भूमिका करणार आहे. या नव्या पात्रांची ओळख करुन देण्याची जबाबदारी शाहरुखने उचललेली असून तो या पात्रांची ओळख करुन देणार आहे. त्यामुळे शाहरुख या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.कोमिलाकाच्या भूमिकेत 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम हिना खान दिसणार असल्याची चर्चा आहे. 'कसौटी जिंदगी की'मध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी हिने प्रेरणाची भूमिका साकारली होती तर सिजेन खान अनुरागच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिका चाहत्यांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्या होत्या. २००१ मध्ये आलेली ही मालिका तब्बल ९ वर्षं सुरू होती. या मालिकेचे हे नवे रूप देखील प्रेक्षकांना तितकेच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 'कसौटी जिंदगी की' मालिका १० सप्टेंबरपासून रात्री आठ वाजता स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

टॅग्स :शाहरुख खान