Join us  

'सावित्री ज्योती' फेम अश्वीनी कासारचा हॉट फोटोतील अदांनी फॅन्स क्लीन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 8:06 PM

Ashwini Kasar's bikini look : सोज्वळ अंदाजाप्रमाणे मॉडर्न अंदाजातील फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली. मात्र काही चाहत्यांची नाराजी व्यक्त केली.

छोट्या पडद्यावरील 'सावित्री ज्योती' मालिकेत अश्वीनी कासारने  सावित्रीबाईंची भूमिका साकारली होती. सर्वत्रच तिच्या अभिनयाचं कौतुक करण्यात आलं होतं. अल्पवाधीतच या मालिकेतून अश्वीनी लोकप्रिय बनली.  'सावित्री ज्योती' मालिकेतल्या तिच्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात तिने स्थान निर्माण केले आहे.

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. अश्वीनीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. अश्वीनी कासार सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात ती असते. तिच्या सोशल मीडिया पेजवर तुम्ही नजर टाकल्यास तिचे विविध अंदाजातील फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. 

तिचा प्रत्येक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरतो. सोज्वळ अंदाजाप्रमाणे मॉडर्न अंदाजातील फोटोंनाही चाहत्यांनी पसंती दिली. मात्र काही चाहत्यांची नाराजी व्यक्त केली.अश्वीनीचा बिकीनीतला फोटो चाहत्यांना काही रुचला नाही. त्यामुळे या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रीया देत नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. 

अभिनयाची भूक असणारे ओमकार गोवर्धन, अश्विनी कासार सारखे कलाकार उत्तम अभिनय करूनही त्यांची मालिका फक्त प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद झाली. या कलाकारांना किती दुःख होत असेल की जीव तोडून मेहनत घेऊन टीआरपीच्या धंदेवाईक स्पर्धेत त्यांची मालिका यशस्वी झाली नाही.