Join us  

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिका नवा वळणावर, अव्दैत-नेत्रा मनोरमाचं सत्य शोधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 4:07 PM

अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय, त्रिनयना देवीचं वरदान असलेली तिसरी स्त्री कोण असेल याची उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहेत.

सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने नुकतेच ३०० भाग पूर्ण केले असून मालिकेत दर आठवड्याला उत्सुकता वाढवणारं नवं वळण पहायला मिळतं. सध्या मनोरमा कोण या प्रश्नाने संपूर्ण महाराष्ट्राला कोड्यात टाकलं आहे. मनोरमा कोण आहे, याविषयी टप्याटप्याने प्रेक्षकांना एकेक गोष्ट ही मालिका पाहताना कळत आहे.

मनोरमाच्या रहस्याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची ओढ पाहून २० ऑगस्टच्या महाएपिसोडची रचना करण्यात आली आहे. मनोरमाच्या रहस्याला दिशा देणारा हा महाएपिसोड असणार आहे. अव्दैत-नेत्राला कळतं की मनोरमाला पद्माकर आजोबा आणि भालबा म्हणजेच आबा हे दोघेही ओळखतात. हा समान धागा पकडून अव्दैत-नेत्रा मनोरमाचं रहस्य शोधायला सुरुवात करतात.

मनोरमाचं राजाध्यक्षांच्या घरात नेत्राला दिसणं, पद्माकर आजोबांचं भूतकाळ आठवून अस्वस्थ होणं, इंद्राणीने रूपालीला आजोबांना मारायला सांगणं, नेत्राला दिसणाऱ्या मृत्यूच्या संकेतांची साखळी अशा महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे.

अव्दैत-नेत्राने मनोरमाचा शोध घ्यायला सुरुवात केल्यामुळे मनोरमाचं सत्य काय, त्रिनयना देवीचं वरदान असलेली तिसरी स्त्री कोण असेल, मनोरमाचा आत्मा स्वतःहून नेत्राला हे सगळं सांगणार का... याची उत्तरंही प्रेक्षकांना मालिका पाहताना मिळणार आहेत. त्यासाठी महाएपिसोडमध्ये मनोरमाच्या रहस्यापर्यंत अव्दैत-नेत्रा कसे पोहोचणार हे पाहायलाच हवं.

टॅग्स :झी मराठी