Join us  

खूप आजारी आहे, मदत करा...! ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्याची फेसबुकवर मदतीची याचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:05 PM

टीव्ही अभिनेत्याकडे उपचारासाठीही नाहीत पैसे

ठळक मुद्देससुराज सिमर का, जीजी और जुजू, बा बहू और बेबी, तू मेर अगल बगल है अशा अनेक मालिकांमध्ये ते झळकले. 

टीव्हीचा लोकप्रिय अभिनेता आशीष रॉयने मदतीची याचना केली आहे. होय, मी आयसीयूमध्ये आहे. गंभीर आजारी आहे, डायलिसीस सुरु आहे. पैशांची अंत्यत गरज आहे. प्लीज मला मदत करा... अशा शब्दांत त्यांनी फेसबुकद्वारे मदतीचे आवाहन केले आहे.आशीष रॉय टीव्हीवरचा एक लोकप्रिय चेहरा. 

2019 पर्यंत आशीष रॉय यांचा टीव्हीवर बोलबाला होता. पण 2019 मध्ये त्यांना लकवा मारला. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार चालले़ यातून ते बरेही झालेत. पण यानंतर त्यांना काम मिळणे बंद झाले. जवळचे असतील नसतील तेवढे पैसे उपचारात संपले, काही दिवस या पैशांवर भागले़ रूग्णालयातून बरे होऊन घरी परतल्यानंतर आशीष यांनी काम मिळवण्यासाठी धडपड सुरु केली. याचदरम्यान या वर्षी जानेवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली, किडनीच्या आजाराने त्यांना ग्रासले, शरीरात 9 लीटर पाणी जमा झाल्याने त्यांच्यावर डायलिसीस सुरु झाले. सध्याही ते डायलिसीसवर आहेत. पण आता डायलिसीस करायलाही पैसे नाहीत, त्यामुळे 54 वर्षीय आशीष यांनी फेसबुकवर मदतीची याचना केली आहे.

भगवान उठा ले मुझे...

काही महिन्यांपूर्वी आजारापणाला कंटाळलेल्या आशीष रॉय यांनी फेसबुकवर काही फोटो शेअर केले होते. या फोटोत ते हसत आहेत. हातात काूफीचा मग आहे. पण मनातल्या भावना मात्र काळीज चिरणा-या आहेत. ‘सकाळची कॉफी...बिना साखरेची... चेह-यावरचे हे हास्य अगतिकता आहे. भगवान उठा ले मुझे...’असे त्यांनी या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.

टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा

आशीष रॉय यांनी 1997 साली अ‍ॅक्टिंग करिअरची सुरुवात केली होती. तेव्हापासून 2019 पर्यंत अनेक हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले. ससुराज सिमर का, जीजी और जुजू, बा बहू और बेबी, तू मेर अगल बगल है अशा अनेक मालिकांमध्ये ते झळकले. होम डिलीवीह व एमनीथ्री- मेरा पहला प्यार या सिनेमांमध्येही त्यांनी काम केलेय.

टॅग्स :टेलिव्हिजन