Join us  

Video : तसा माणूस Whatsapp वर असतो, संकर्षण कऱ्हाडेची भन्नाट कविता व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 5:19 PM

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

परभणीचं नाव मनोरंजन विश्वात गाजवणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार या झी मराठीच्या कार्यक्रमात 2008 ला तो दिसला होता. ‘माझीया प्रियाला’ आणि  ‘आभास हा’ या मालिकांमध्ये  संकर्षणने काम केले आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं.  यासोबतच ‘लोभ असावा’, ‘मी रेवती देशपांडे’ या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण  त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आण प्रेक्षकांना नेहमीच विचार करायला भाग पाडणाऱ्या असतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते. नुकतीच त्याने व्हॅट्सअ‍ॅप  या सोशल मीडियावर अ‍ॅपवर एक भन्नाट कविता केलीये... जी सध्या कमालीची व्हायरल होतेयं..

सध्या पुन्हा एकदा मिनी लॉकडाऊन लागल्यानं संकर्षणनं आपलं हत्यार म्हणजेच पेन हातात घेत थेट दररोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या  व्हाट्सअॅपवर कविता केलीयं.. What’s app फुकाट संस्था .. 😀 आपण सगळेच ज्याच्यावर आहोत अशा , “#whatsapp फुकाट संस्थेवर..” काही ओळी.....🤪 ऐका .. बघा .. तुमच्या ग्रुपवरचे “व्यक्ती आणि वल्ली” तुम्हाला ह्यात दिसले तर सांगा. असे कॅप्शन त्याने या कवितेसोबत दिलं आहे. 

टॅग्स :झी मराठी