Join us

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील शेवटचा सीन शूट करताना भावूक झाला संकर्षण, म्हणाला- यश-समीर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 13:23 IST

लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर नवीन मालिका दाखल होताना दिसत आहेत. त्यामुळे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत. अशातच लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath ) हा प्रेक्षकांची आवडती मालिका देखील प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. यश व नेहाच्या प्रेमाची कथा सांगणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

या मालिकेतील यशचा मित्र समीरची भूमिका साकारणार संकर्षण कऱ्हाडेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.  यामध्ये त्यानं समीर आणि यशच्या शेवटचा सीन शूट झाल्याचं प्रेक्षकांना सांगितलं. यावेळीचे फोटो शेअर करत त्यानं एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. संकर्षणने लिहिले, बाय बाय यश समीर. काल आम्ही यश आणि समीर म्हणुन “माझी तुझी रेशीमगाठ” मालिकेतला शेवटचा सीन शूट केला.

मला माझ्या मित्राची , यशची ..माझ्या पात्राची , समीरची .. आणि त्यांच्या अफ्फलातून मैत्रीची कायम आठवण येत राहील .. I LOVE YOU @shreyastalpade27 दादा..I miss you ही दोस्ती तुटायची नाय ..(खूप बोलायचंय .. सांगायचंय.. सविस्तर लिहिनच..) यश आणि समीरच्या मैत्रीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 

दरम्यान श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ च्या जागी ‘दार उघड बये’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. ‘दार उघड बये’ ही मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होतेय.

टॅग्स :श्रेयस तळपदेप्रार्थना बेहरेझी मराठी