'संध्या बिंदणी'ला हे काम करण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 12:12 IST
'दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती ...
'संध्या बिंदणी'ला हे काम करण्याची इच्छा
'दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय.बाळाच्या जन्मानंतर ती वर्कआऊट, डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.ती नेहमी तिने इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ शेअर करत असते.यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे.दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत असल्यातरी आता तिला मालिकांमध्ये रस नाही तर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा आहे.बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची प्रत्येकाची इच्छा असते. बिग बॉस हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडतो. या कार्यक्रमाचे सगळेच सिझन आजवर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहेत. या कार्यक्रमाचा ११ वा सिझन जानेवारी महिन्यात संपला असून शिल्पा शिंदे या सिझनची विजेती बनली. या कार्यक्रमाचा १२ वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनसाठी ऑडिशन्सना देखील सुरुवात झाली आहे. पण यंदाच्या सिझनमध्ये एक ट्विस्ट असणार आहे. कारण यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक जोड्यांमध्ये भाग घेणार आहेत. कलर्स टिव्ही वाहिनीने त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. कलर्स वाहिनीकडून ट्वीट करून सांगण्यात आले आहे की, बिग बॉस १२ लवकरच सुरू होणार असून यावेळी स्पर्धक जोड्यांमध्ये हा खेळ खेळणार आहेत. त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या जोडीदारासोबत हा खेळ खेळू शकता. या वेळी दुप्पट धमाल असणार आहे. ऑडिशनला सुरुवात देखील झाली आहे.