लॉकडाऊनमध्ये अभिनेत्री संभावना सेठची तब्येत अचानक बिघडली आहे. यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. संभावनाच्या पतीने हि माहिती दिली की तिला २४ तासात दुसऱ्यांदा हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल आहे.
रात्री अचानक तिची तब्येत बिघडली म्हणऊन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पहाटे ५ वाजता डॉक्टरांनी तिली डिस्चार्ज दिला तर ती घरी आली. त्यानंतर अचानक काही वेळाने तिची तब्येत बिघडली म्हणून तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेले. संभावनाचे फॅन्स तिच्या लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करतायेत.
संभावना सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससाठी ती व्हिडीओ ब्लॉगदेखील करत असते. संभावना बिग बॉसमध्ये सुद्धा दिसली होती. संभावनाच्या पतीने सोशल मीडियावर तिच्या तब्येती बाबतची माहिती दिली.
संभावनाचा पती अविनाशने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लिहिले आहे की, '' रात्री तिची तब्येत अचानक बिघडली म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सकाळी ५ वाजता तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही दोघे घरी परतलो. मात्र तिची अचानक तब्येत पुन्हा बिघडली त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये पुन्हा दाखल केले आहे. आज तुम्हाला व्हिडीओ ब्लॉग बघायला मिळणार नाही .''