Join us  

सलमान म्हणतो, बिग बॉसमुळे मला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 2:56 PM

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. बिग बॉसचे 12 सीझन 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्देबिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत

बिग बॉसचे 12 सीझन 16 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या शोचा लॉचिंग सोहळा गोव्यात पार पडला. सलग 9व्या सीझनचा होस्ट म्हणून परत येण्याविषयी बोलताना, सुपरस्टार सलमान खान म्हणाले, “बिग बॉस या शोकडे देश तर अपेक्षेने पाहतोच आहे पण मी सुध्दा त्याच समान उत्सुकतेच्या अपेक्षने पाहतो. जरी मी 8 वर्षांपासून त्याचे होस्टिंग करत असलो तरी प्रत्येक वेळी मला त्यातून नवीन अनुभव मिळतो आणि मी काही नवीन संबंध जोडतो. विचित्र जोडी ही संकल्पना अतिशय विलक्षण आहे आणि आम्ही निवडलेल्या अफाट जोड्यांची छबी प्रेक्षकांना शोशी तल्लीन करेल नक्कीच. या जोड्या एकमेकांच्या मागे आहेत की कठीण काळात तुटल्या आहेत हे पाहणे गंमतीदार असणार आहे.”

बिग बॉस या कायक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या गेल्या सिझनची विजेती शिल्पा शिंदे ठरली होती. यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक एकटे नसून जोड्यांमध्ये येणार आहेत. ही जोडी पती-पत्नी, मुलगा-मुलगी कोणाचीही असू शकते. तथापि, बिग बॉस 12 आता जोडीची संकल्पनाच बदलण्यासाठी सज्ज झाला आहे. कारण त्यांची थीमच आहे विचित्र जोड्या. सासू-सून, मामा-भाचा, मालक-नोकर अशा विविध जोड्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. या सीझनच्या बारा जोडींपैकी पहिली जोडी आहे कॉमेडियन भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया. सलमानने त्यांच्या नावाची घोषणा या कार्यक्रमात केली

टॅग्स :बिग बॉस 12सलमान खान