Join us  

Bigg Boss 13 : WHAT ? फी वाढवण्यासाठी सलमान खान देतो ‘बिग बॉस’ सोडण्याची धमकी ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 11:10 AM

Bigg Boss 13 : सलमानवर गंभीर आरोप

ठळक मुद्दे सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचेतर सध्या तो त्याचा आगामी सिनेमा ‘राधे’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

बिग बॉस’चा 13 वा सीझन कधी नव्हे इतका गाजला. येत्या 15 तारखेला ‘बिग बॉस 13’ चा ग्रॅण्ड फिनाले आहे. काल सोमवारीच्या एपिसोडमध्ये  सलमान पुन्हा एकदा दिसला. सोबत  नीना गुप्ता, आयुष्मान खुराना, जितेंद्र कुमार यांनीही आपल्या ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली. विशेष म्हणजे, या एपिसोडमध्ये रजत शर्मा यांनीही हजेरी लावत सलमानला आरोपीच्या पिंज-यात उभे केले. मग काय, ‘सवाल-जवाब’चा ‘सिलसिला’ चांगलाच रंगला. पण याचदरम्यान रजत शर्मा यांनी सलमानवर एक गंभीर आरोप केला आणि सगळेच थक्क झालेत.तू 10 वर्षांपासून ‘बिग बॉस’चा होस्ट आहे आणि दरवर्षी तू हा शो सोडणार, असे मी ऐकतो. नेमकी ही काय भानगड आहे. माझ्या मते, तू तुझी फी वाढवण्यासाठी दरवर्षी शो सोडण्याची धमकी देतोस, असा आरोप रजत शर्मा यांनी सलमानवर ठेवला. रजत शर्मा यांचा हा आरोप ऐकून सलमान हसत सुटला आणि हसत हसत, या सगळ्या फक्त धमक्या आहेत. पण इतके करूनही हे लोक माझी फी काही वाढवत नाहीत, असे सलमान म्हणाला.

आसिमला तू बाहेरची बातमी दिलीस. त्याच्यामुळे हिमांशीचा साखरपुडा तुटला, हे त्याला सांगितलेस, असा आणखी एक आरोप रजत शर्मा यांनी सलमानवर केला. यावर, हो, हिमांशी साखरपुडा करून घरात आली होती. आसिम तिच्यावर भाळला. ती घराबाहेर पडल्यावर तो चॅप्टरही संपला,असे सलमान म्हणाला. यावर तू  सगळ्यांचे चॅप्टर संपवण्याच्या मागे का पडला आहेस? असे रजत शर्मा सलमानला विचारतात. या प्रश्नावरही सलमानला   हसू आवरत नाही. कारण माझा चॅप्टर सुरु होत नाहीये... असे सलमान हसत हसत म्हणतो. रजत शर्मा यावरही सलमानची फिरकी घेतात एकंदर ‘ना तो खुद शादी करूंगा और न करने दूंगा,’ असे ते म्हणतात. यावर सगळेच हसायला लागतात.

सलमानच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायचेतर सध्या तो त्याचा आगामी सिनेमा ‘राधे’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे.  या सिनेमात अभिनेत्री दिशा पाटनी सलमान सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा सिनेमा यावर्षी ईदच्या दिवाशी रिलीज होत आहे. 

टॅग्स :सलमान खानबिग बॉस