Join us  

कोरोना काळात सलमानने वाढवले मानधन, Bigg Boss 14 साठी घेणार एवढी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:44 PM

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते.

'बिग बॉस 14'ची तयारी सुरू झालीय. या सीझनमध्ये कोण कोण. स्पर्धक असणार याबाबत तर्कवितर्क आणि चर्चा सुरू झाल्यात. हा शो ऑक्टोबरमध्ये सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. या सिझनलाही सलमानच होस्ट करणार आहे. सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. आज बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसे घेणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. 

नेहमीप्रमाणे 'बिग बॉस 14' साठी सलमानेही आपलं मानधन दुप्पट केले असून एका एपिसोडसाठी 16 कोटी रुपये मानधन घेणार असल्याचे माहिती समोर येत आहे. 'बिग बॉस १३' वेळी असं म्हटलं जात होतं की सलमानला प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास १३ कोटी रुपये देण्यात आले. यानुसार १३ व्या सीझनसाठी सलमानने जवळपास २०० कोटींची कमाई केली. प्रत्येक सीझनमध्ये सलमानचं मानधन वाढतं. १२ व्या सीझनसाठी त्याने एका एपिसोडसाठी ११ कोटी घेतल्याचं म्हटलं जात होतं.

आपल्या कामावरील प्रेम,जिद्द आणि मेहनतीमुळे सलमानने नवी उंची गाठली असून तो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. कोणतंही काम करताना तो त्याच उत्साहाने तो काम करतो..त्यामुळं आजवर जीवनात कितीही चढउतार आले तरी तो डगमगला नाही... कोणतंही काम उत्साह, जिद्द आणि मेहनतीने करतो.

टॅग्स :सलमान खानबिग बॉस