Join us  

Bigg Boss Marathi 2 : भाईजानही झाला फिदा! म्हणे, बिचुकलेंना हिंदी बिग बॉसमध्ये पाठवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 3:32 PM

‘बिग बॉस मराठी 2’ हा छोट्या पडद्यावरचा रिअ‍ॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकांना आज (11ऑगस्ट) विकेंडच्या डावात  एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर भाईजान सलमान खान.

ठळक मुद्दे  लवकरच हिंदी बिग बॉस 13 ला देखील सुरूवात होणार आहे. हिंदी बिग बॉस सलमान खान त्यांच्या हटके अंदाजात होस्ट करतो.

बिग बॉस मराठी 2’ हा छोट्या पडद्यावरचा रिअ‍ॅलिटी शो आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशात बिग बॉसच्या स्पर्धकांना आज (11ऑगस्ट)  विकेंडच्या डावात  एक मोठे सरप्राईज मिळणार आहे. हे सरप्राईज काय तर भाईजान सलमान खान. कालच्या एपिसोडमध्ये महेश मांजरेकरांनी या सरप्राईजबद्दलची हिंट सदस्यांना सांगितले होते. त्यानुसार, आजच्या विकेंडच्या डावात महेश मांजरेकरांसोबत सलमान खान  ‘बिग बॉस मराठी 2’च्या सेटवर हजेरी लावणार आहे. पण खास गोष्ट म्हणजे, हा सलमान ‘बिग बॉस’च्या घरातीलच्या एका प्रेमात पडला आहे. हा सदस्य कोण तर अभिजीत बिचुकले.

होय, अभिजीत बिचुकले यांनी सुरुवातीपासून आपल्या आगळ्या-वेगळ्या शैलीने बिग बॉसच्या घरात अपार लोकप्रियता मिळवली. त्यांची भांडणे, त्यांच्या कविता, त्यांची स्टाईल सगळेच लोकप्रिय झाले. आता खुद्द भाईजानही बिचुकलेंच्या या स्टाईलचा ‘दिवाना’ झाला आहे. त्याचमुळे बिचुकलेंना बिग बॉस हिंदीमध्ये पाठवा, असे सलमानने म्हटले आहे. अर्थात त्याच्या इच्छेनुसार, अभिजीत बिचुकले खरोखरच हिंदी बिग बॉसमध्ये जाणार का, या प्रश्नाचे उत्तर सध्या गुलदस्त्यात आहे. 

आजच्या एपिसोडमध्ये ‘बिग बॉस मराठी 2’ सूत्रसंचालक महेश मांजरेकर सलमानला घरातील सदस्यांची ओळख करून देतील. यादरम्यान अभिजीत बिचुकले आणि हिना या दोघांचा डान्सही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘देखा है पहली बार’ या गाण्यावर दोघेही थिरकताना दिसतील.  लवकरच हिंदी बिग बॉस 13 ला देखील सुरूवात होणार आहे. हिंदी बिग बॉस सलमान खान त्यांच्या हटके अंदाजात होस्ट करतो.

टॅग्स :बिग बॉस मराठीसलमान खानअभिजीत बिचुकले