Join us

'कोण होणार मराठी करोडपती', नागराज मंजुळे करणार सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 14:51 IST

कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे  या सूत्रसंचालन करणार आहे.

अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सुरू करण्यात आला. मराठीेचे पहिले पर्व हे सचिन खेडकेर यांनी सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर स्वप्निल जोशीने या शोची सूत्रसंचालकाची जबाबदारी पार पाडली होती. आता पुन्हा एकदा या शोचे तिसरे पर्व रसिकांचे भेटीला येणार आहे. कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून या शोचे सूत्रसंचालन कोण करणार याविषयीची उत्सुकता शिगेला पोहचली होती. अखेर सूत्रसंचालन कोण करणार यावरून पडदा उठला आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे  या सूत्रसंचालन करणार आहे.

'सैराट' सिनेमाच्या माध्यमातून  रूपेरी पडदा गाजवाणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता छोट्या पडद्यावर संगणक राजेंना विनंती करताना दिसणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा होणार सामान्यांचे स्वप्न साकार, मराठी माणूस बनणार ‘कोट्यधीश.’ अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटणार हे मात्र नक्की. 

टॅग्स :नागराज मंजुळे