तब्बल 9 वर्षांनंतर सैफ अली खान आणि अक्षय कुमार येणार एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:02 IST
आपल्या पैकी अनेकांचे बालपण सैफ अली खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट बघून गेले असेल. नव्वदच्या दशकात या जोडीचा एक ...
तब्बल 9 वर्षांनंतर सैफ अली खान आणि अक्षय कुमार येणार एकत्र
आपल्या पैकी अनेकांचे बालपण सैफ अली खान आणि अक्षय कुमारचे चित्रपट बघून गेले असेल. नव्वदच्या दशकात या जोडीचा एक वेगळाच चार्म होता. सैफ आणि अक्षयमध्ये असलेली बॉन्डिंग स्क्रिनवर सुद्धा दिसायचे. जर तुम्ही सैफ आणि अक्षयच्या चित्रपटांचे फॅन्स आहात तर तुमच्यासाठी आमच्याकडे एक गुडन्युज आहे. अक्षय आणि सैफची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हो तुम्ही बरोबर वाचलात लवकरच दोघे एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. तब्बल 9 वर्षांनंतर दोघांची ही जोडी धमाल उडवून द्यायला सज्ज झाली आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार सैफ आणि अक्षय एका आगामी कॉमेडी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये एकत्र दिसणार आहे. अक्षय या शोमध्ये सुपर बॉसच्या खुर्चीवर बसलेला दिसणार आहे तर शो च्या पहिल्या एपिसोडमध्ये सैफ गेस्ट म्हणून हजेरी लावणार आहे. काही दिवसांपूर्वीच या शो चो प्रोमो रिलीज झाला होता. ज्यांने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. या उद्या शोचा पहिला एपिसोड शूट करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मिररला सूत्रांनी दिली आहे. दोघे आपल्या सुपरहिट साँग मैं खिलाडी तू अनाडीवर एकत्र परफॉर्म करण्याची शक्यता आहे. सैफ आणि अक्षयने 1994 पासून ते 2008 पर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. दिल्लगी, कीमत, आरजू आणि टशन सारख्या चित्रपटांचा यात समावेश आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर सैफ अली खानचा आगामी चित्रपट शेफच्या ट्रेलरसुद्धा नुकताच आऊट झाला आहे. यात चित्रपटांतून नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. विदेशात राहणारा एक शेफ अर्थात सैफ अली खान आपल्या मुलासाठी कोचीनला येतो. म्हणजेच यात एका बाप आणि मुलाची शिवाय एका पती-पत्नीच्या घटस्फोटाची कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदर सांगायचे तर नेहमीपेक्षा एक वेगळा विषय यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. राजा कृष्ण मेनन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या ६ आक्टोबरला रिलीज होतो आहे.