Join us

सईला घ्यायची कबड्डीची टीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 02:28 IST

बॉलिवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सई ताम्हणकर हिने  नुकतेच अभिनेता सुशांत शेलार याने आयोजित ...

बॉलिवुड व मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविणारी सई ताम्हणकर हिने  नुकतेच अभिनेता सुशांत शेलार याने आयोजित केलेल्या कबड्डी चषकला हजेरी लावली होती. म्हणून याविषयी सईशी लोकमत सीएनएक्सने संवाद साधला असता ती म्हणाली,कबड्डी हा खेळ माझी जान आहे. कारण बालपणापासून या खेळाशी माझे नाते रूढ आहे. शाळेत असल्यापासून कबड्डी खेळायची. या खेळात मी स्टेट लेव्हलपर्यत बाजी मारली आहे. म्हणून कबड्डी या खेळाशी काहीही संबंधित कार्यक्रम कुठे ही असेल तरी आवर्जुन व उत्साहाने मी हजेरी लावते. पण कॉलेज व करियरच्या ओघात हा खेळ माझ्याकडून सुटला गेला. पण या खेळाशी अधिक नाते घट्ट करण्यासाठी जर तुला कबड्डीची टीम विकत घ्यायला आवडेला का असे विचारल्यावर सई म्हणाली, इन्शाअल्लाह, जर देवाच्या मनात असे काही घडवायचे असेल तर नक्कीच मी कबड्डीची टीमदेखील विकत घेईन.