Join us

Casting Couch: 'अचानक त्याने प्रायव्हेट पार्ट...', 'पद्मावत' फेम अभिनेत्यासोबत घडली धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 14:35 IST

अभिनेता म्हणाला, या घटनेने त्याला हादरवून सोडले. मी डिप्रेशनमध्ये होतो, सगळ्यांना भेटायला घाबरत होतो.

टीव्हीपासून मोठ्या पडद्यापर्यंत इंडस्ट्रीतील अनेक कलाकार कास्टिंग काउच (Casting Couch)चा सामना करावा लागला आहे. चित्रपट किंवा टीव्हीमध्ये काम करण्यासाठी मोठ्या स्टार्सना तडजोड करावी लागते, असा सर्वसाधारण समज आहे. यातील काही स्टार्स यावर आपली बाजू उघडपणे जगासमोर ठेवतात तर काहीजण गप्प बसतात. आता टीव्ही अभिनेता सार कश्यप (Saarrh KKashyap)नेही त्याच्यासोबत घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ देत धक्कादायक खुलासा केला आहे.

सार कश्यपने केला कास्टिंग काऊचचा सामना एका मुलाखतीत, सारने म्हणाला की सुरुवातीच्या दिवसांत त्यालाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला.  अभिनेता म्हणाला, “ज्यावेळी मी इंडस्ट्रीत करिअर सुरू केले तेव्हा कामाच्या संदर्भात मी अनेक कास्टिंग डायरेक्टर्सना भेटायचो. मला चांगलं आठवतंय की एके दिवशी मी अशा प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टरला भेटलो होतो. त्या व्यक्तीने मला सांगितले की, इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी अभिनय, टॅलेंटसोबतच विशेष कौशल्याचीही गरज असते. सुरुवातीला मला समजले नाही पण नंतर तो म्हणाला की मी त्याला त्याच्या घरी भेटायला यावे.'

अभिनेता म्हणाला, 'मला करिअर करायचं होतं, म्हणून मी त्यांना भेटण्यासाठी दिग्दर्शकाच्या घरी पोहोचलो. काहीवेळ आमच्यात कामाच्या चर्चा झाल्या. यानंतर दिग्दर्शकाने मला सांगितले की, इंडस्ट्रीत कामापेक्षा खाजगी गोष्टी जास्त असतात. त्याला माझा प्रायव्हेट पार्ट बघायचा होता. मी फक्त म्हणालो की सर मी माझ्या ऑडिशनवर जास्त लक्ष देईन आणि नकार देऊन तिथून बाहेर पडलो. माझ्यासाठी ही घटना धक्कादायक होती.

सार कश्यपने पुढे सांगितले की, या घटनेने त्याला हादरवून सोडले. तो म्हणाले, 'मोठ्या पदांवर असलेले लोक छोट्या शहरातून आलेल्या कलाकारांचे शोषण करतात, हे मला त्यावेळी समजले. मी डिप्रेशनमध्ये होतो, सगळ्यांना भेटायला घाबरत होतो. महिलांप्रमाणेच पुरुषांसाठी मुंबई किती असुरक्षित आहे हे मला समजले.

कोण आहे सार कश्यप?लौट आओ तृषा', 'बडी दूर से आये है' पासून 'बाल कृष्णा' पर्यंत टीव्ही शोमध्ये काम केले आहे. याशिवाय 'पद्मावत' चित्रपटातही हा अभिनेता 'वरधन'ची भूमिका साकारताना दिसला होता. 

टॅग्स :टिव्ही कलाकारकास्टिंग काऊच