सारेगमप लिटल चॅम्प्स विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सतत चर्चेत येत असते. तिने आपल्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. कार्तिकीला सारेगमप लिटल चॅम्प्स शोमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. गायिकेनं २०२० साली लग्न केले. लग्नानंतर जास्त संसारात रमली आहे. मागील वर्षी कार्तिकीने मुलाला जन्म दिला आणि सध्या ती आईपण एन्जॉय करते आहे. दरम्यान आता तिने लेकाच्या पहिला वाढदिवसानिमित्त सुंदर फोटोशूट आणि व्हिडीओ शूट केला आहे.
कार्तिकी गायकवाड हिने मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये ती नवरा आणि मुलासोबतचे फोटो शेअर केले आहेत. तिने फोटोला कॅप्शन दिले की, रिशांक कार्तिकी रोनित पिसे. फोटोशूटमध्ये त्यांची छान केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसेने २०२०मध्ये थाटामाटात लग्न केले. त्यानंतर मागील वर्षी तिने मुलाला जन्म दिला. तिचे डोहाळे जेवणदेखील थाटामाटात पार पडले होते. त्याचे फोटोदेखील तिने शेअर केले होते.
काही दिवसांपूर्वी कार्तिकी गायकवाडने तिच्या युट्यूब चॅनलवर 'नीज बाळा' ही अंगाई रिलीज केली होती. यामध्ये तिने लेकाचे नाव उघड केले आहे. व्हिडिओच्या शेवटी रिशांक कार्तिकीच्या मांडीवर शांत निजलेला दिसतो. आई, वडील आणि लेकाचा हा क्युट व्हिडिओ भावुक करणारा आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.