Join us

​रुहानिका बनली गब्बर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 17:02 IST

ये है मोहोब्बते या मालिकेतील रुहानिका धवन ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत सुरुवातीला ती रुही ही व्यक्तिरेखा ...

ये है मोहोब्बते या मालिकेतील रुहानिका धवन ही प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. या मालिकेत सुरुवातीला ती रुही ही व्यक्तिरेखा साकारत होती. या मालिकेने लीप घेतल्यानंतर रुहानिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असे सगळ्यांना वाटत होते. पण रुहानिकाची लोकप्रियता खूप असल्याने लीपनंतरही ती एका नव्या व्यक्तिरेखेद्वारे मालिकेत झळकली. आता ती पियू ही व्यक्तिरेखा मालिकेत साकारत आहे. कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा या कार्यक्रमात नुकतेच किड्स स्पेशल होते. छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अनेक छोट्या कलाकारांना यावेळी आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात दर्शिल सफारी, सिद्धार्थ निगम, पार्थ भालेराव, प्रीतज्योत सिंग, रुहानिका धवन यांसारख्या बालकलाकारांनी खूप मजा केली. रुहानिका तर प्रेक्षकांना गब्बरच्या वेशात पाहायला मिळाली.