Join us
Daily Top 2Weekly Top 5

'शतदा प्रेम करावे' मध्ये सायलीच्या भूमिकेत ज्ञानदा रामतीर्थकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 10:56 IST

स्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ...

स्टार प्रवाहच्या 'शतदा प्रेम करावे' या लोकप्रिय मालिकेत एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतल्या सायली या भूमिकेत स्नेहा शहाच्या ऐवजी ज्ञानदा रामतीर्थकर ही अभिनेत्री दिसणार आहे. अल्लड, अवखळ असलेली सायली ही भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे पहावं लागेल.अल्लड प्रेमाची अबोल गोष्ट 'शतदा प्रेम करावे' या मालिकेत उलगडली आहे. या मालिकेनं अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. उन्मेष आणि सायली यांच्या नात्याला आता प्रेमाची किनार लाभते आहे. त्या दोघांमध्ये हळवं नातं निर्माण होऊ लागलं आहे. मात्र, सायलीची भूमिका साकारणारी स्नेहा शहा काही कारणानं या मालिकेत काम करू शकणार नाही. तिची जागा आता अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर घेत आहे. या मालिकेतून ज्ञानदाचं स्टार प्रवाहवर पदार्पण होत आहे. सायलीची भूमिका साकारण्याविषयी ज्ञानदा म्हणाली, "शतदा प्रेम करावे'ची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे. अभिजित साटम, अमिता खोपकर, प्रिया मराठे हे माझे आवडते कलाकार आहेत. त्याच मालिकेसाठी मला विचारणा झाल्यावर मी लगेच होकार दिला. सायलीच्या भूमिकेलाही खूप कंगोरे आहेत. त्यामुळे ही भूमिका करायलाही नक्की मजा येईल. या भूमिकेसाठी मी खूप एक्सायटेड आहे. स्टार प्रवाहच्या 'अग्निहोत्र' आणि 'राजा शिवछत्रपती' या मालिका मी नियमितपणे पहायचे. 'शतदा प्रेम करावे'चं टायटल साँग मला प्रचंड आवडलं. स्टार प्रवाहबरोबर काम करायला मिळावं अशी इच्छाही होतीच. 'शतदा प्रेम करावे' च्या रुपानं ती पूर्ण होत आहे. यासाठी स्टार प्रवाहचे आणि सोबा फिल्म्सचे अनेक आभार."  उन्मेष आणि सायलीच्या नात्याचं पुढे काय होणार आणि सायलीची भूमिका ज्ञानदा कशी साकारणार हे आपल्याला लवकरच कळेल.