Join us  

नीलू वाघेला साकारणार वकिलाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 12:54 PM

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आता एक नवीन मालिका, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’. यातील कलाकारांची निवड करण्यात येत आहे आणि त्यातील एक ठळक चेहरा आहे, नीलू वाघेलाचा.

ठळक मुद्देनीलू वाघेला या मालिकेत प्रमुख भूमिका करणार आहे त्या यात वकिलाची भूमिका साकारणार आहेत.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आता एक नवीन मालिका, मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’. यातील कलाकारांची निवड करण्यात येत आहे आणि त्यातील प्रसिद्ध चेहरा आहे, नीलू वाघेलाचा. टेलिव्हिजन उद्योगात सुपरिचित असलेली नीलू वाघेला या मालिकेत प्रमुख भूमिका करणार आहे आणि एका वकिलाच्या रूपात दिसणार आहे.

नीलू वाघेलाला विचारले असता तिने सांगितले, “होय, हे खरे आहे. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो’ या नवीन मालिकेचा मी अविभाज्य भाग असणार आहे. पडद्यावरील माझ्या व्यक्तिरेखेचे नाव आहे सत्या देवी आणि ती आजच्या काळातील स्त्री आहे. ती सुशिक्षित स्त्री आहे आणि व्यवसायाने एक वकील आहे. मी यापूर्वी अशी भूमिका कधीच साकारलेली नाही. मला खात्री आहे की, प्रेक्षकांना माझी व्यक्तिरेखा आवडेल.”

काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत नीलू वाघेला म्हणाल्या होत्या कॉमेडी भूमिकाही साकराण्याची इच्छा असल्याचे सांगितले. नच बलिये या कार्यक्रमात डान्सिंग अंदाज रसिकांना पाहायला मिळाला होता. या शोमुळे त्यांच्या कौशल्या रसिकांनाही जाणून घेता आले. त्यामुळे आता साचेबध्द पध्दतीतील भूमिकेक्षा कॉमेडीकडेही वळायचा भाभोचा प्रयत्न असणार असल्याचेही सांगितले.  दिया और बाती हम ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली. अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.