Join us

​इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्समध्ये रोहित शेट्टी दिसणार एका वेगळ्या अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 15:31 IST

सध्या छोट्या पडद्यावर एका पाठोपाठ एक रिअॅलिटी शो रसिकांच्या भेटीला येत आहेत. याच यादीत आता आणखीन एका शोची भर ...

सध्या छोट्या पडद्यावर एका पाठोपाठ एक रिअॅलिटी शो रसिकांच्या भेटीला येत आहेत. याच यादीत आता आणखीन एका शोची भर पडणार आहे. इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्स या कार्यक्रमात प्रेक्षकांना अभिनय क्षेत्रातील अतिशय दुर्मिळ अशी आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमात करण जोहर आणि रोहित शेट्टी हे सामान्य लोकांसाठी बॉलिवूडचे दरवाजे केवळ खुलेच करत नाहीयेत तर त्यांच्या सिनेमांमध्ये या शोमधील विजेत्यांना ब्रेकही देणार आहेत. या शोबद्दल रोहित शेट्टी सांगतो, “माझ्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे फक्त एकच गोष्ट एन्टरटेनमेंट. जर एक फिल्म मेकर म्हणून मी ते करू शकलो तर मी माझे काम केले आहे. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्यासमोर असता तेव्हा गोष्ट वेगळी असते. अशा अनेक अभिनेत्यांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या मेहनतीने, टॅलेंटने सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे आणि अनेक दशके उलटून गेल्यानंतरही प्रेक्षकांच्या मनामध्ये ते घर करून आहेत. इतक्या वर्षांनी देखील त्यांची लोकप्रियता कशी काय कायम आहे याची व्याख्या कोणीच करू शकणार नाही. एक चांगला अभिनेता नेहमीच लक्षात राहतो आणि देशातील रसिकही त्याच्यावर प्रेम करतात. त्यामुळे स्टार इंडिया आमच्यासोबत इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्सचा शोध घेणार आहेत.”करण जोहर आणि रोहित शेट्टी असा मिलाफ याआधी कधीही पाहण्यात आलेला नव्हता. आता हे दोघे इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार्ससाठी एकत्र आले असून ते जगाला सांगतील ''ना खानदान, ना सिफारिश... बॉलिवूड को है सिर्फ टॅलेन्ट का इंतजार'. या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात रोहित शेट्टीचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आपल्या चित्रपटांमध्ये अभिनव स्टंट्‌स करण्यासाठी मानला जाणारा रोहित शेट्टी इंडियाज्‌ नेक्स्ट सुपरस्टार्सच्या प्रीमिअर एपिसोडमध्ये एरियल अॅक्ट करताना दिसणार आहे. तो गोलमालच्या गाण्यावर मिड एअर स्पोर्ट्‌स कारवर डान्स करताना दिसणार आहे. रोहितने याआधी असे काही कधीच केलेले नाहीये. त्यामुळे या कार्यक्रमात हा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी तो अतिशय उत्सुक आहे. रोहित या परफॉर्मन्सनच्या दरम्यान गाडीची काच फोडतानाही दिसणार आहे.Also Read : गोलमाल अगेन नंतर गोलमाल ५ प्रेक्षकांच्या भेटीला?