थपकी प्यार की या मालिकेत आरजे सिद्धूची एंट्री होणार आहे. आरजे सिद्धू पूर्वीही छोट्या पडद्यावर झळकला होता. टीव्ही का पहिला रेडिओ शो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन त्याने केले होते. थपकी प्यार की या मालिकेत सिद्धूची भूमिका ही अतिशय छोटी असली तरी ती महत्त्वाची असणार आहे. तो या मालिकेत एका आरजेचीच भूमिका साकारत आहे. या मालिकेत सिद्धू आरजेची भूमिका साकारत असला तरी ही भूमिका खूप वेगळी असल्याचे तो सांगतो.
आरजे सिद्धू मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2016 14:37 IST