रिया दिया और बाती हममध्ये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2016 16:59 IST
कहानी हमारी ,इतना करो ना मुझे प्यारे यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली रिया शर्मा दिया और बाती हम 2 या मालिकेत ...
रिया दिया और बाती हममध्ये?
कहानी हमारी ,इतना करो ना मुझे प्यारे यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेली रिया शर्मा दिया और बाती हम 2 या मालिकेत काम करणार असल्याची चर्चा आहे. दिया और बाती हम ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या दीपिका सिंग आणि अनस रशिद या दोघांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेने काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अविनेश रेखी प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्यासोबत रिया शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेचे चित्रीकरण या महिन्याच्या अखेरीपर्यंत सुरू होणार असल्याची चर्चा आहे. प्रेक्षकांची आवडती मालिका त्यांच्या लवकरच भेटीस येणार आहे हे नक्की.