Join us  

‘ये रिश्ता क्या कहलाता है!’मध्ये होणार ऋतुराज सिंहची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 6:30 AM

'स्टार प्लस’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत आहे.

ठळक मुद्देआगामी भागांमध्ये एका नव्या व्यक्तिरेखेचा या मालिकेत प्रवेश होणार आहे

'स्टार प्लस’वर अलीकडेच सुरू झालेल्या ‘ये रिश्ते है प्यार के’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत नायिका मिष्टीची भूमिका अभिनेत्री रिया शर्मा साकारीत असून यात ती आजवर कधी न पाहिलेल्या रूपात प्रेक्षकांना दिसणार आहे. आगामी भागांमध्ये एका नव्या व्यक्तिरेखेचा या मालिकेत प्रवेश होणार आहे. अभिनेता ऋतुराज सिंह हा लवकरच एका नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

ऋतुराज सिंहने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या असून त्याने आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटविला आहे. या नव्या भूमिकेबद्दल तो म्हणाला, “‘ये रिश्ता क्या कहलाता है!’ या मालिकेत एक रंजक व्यक्तिरेखा साकारण्याच्या कल्पनेने मी उत्साहित झालो आहे. ज्या भूमिकांमध्ये काहीतरी वैशिष्ट्य असतं, अशाच भूमिका स्वीकारण्यावर माझा कटाक्ष आहे आणि यातील ही भूमिका मला अगदी हवी तशी आहे. मी आजवर कधीच नकारात्मक भूमिका साकारलेली नाही. पण या व्यक्तिरेखेला तशा छटा असल्यानेच मी ती स्वीकारली. आता मी या व्यक्तिरेखेच्या अंतरंगात प्रवेश करण्यास अधीर झालो आहे.”

आता ऋतुराज सिंहच्या आगमनामुळे ‘स्टार प्लस’वरीलये रिश्ता क्या कहलाता है!’च्या कथानकाला मिळणाऱ्या अनपेक्षित कलाटणीमुळे ही मालिका अधिकच नाट्यमय होताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

टॅग्स :ये रिश्ता क्या कहलाता हैस्टार प्लस