रिमाचा कमबॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:04 IST
रिमा लागू तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. रिमा लागूने दरम्यानच्या काळात मराठी मालिकेत काम केले होते. पण ...
रिमाचा कमबॅक
रिमा लागू तब्बल आठ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. रिमा लागूने दरम्यानच्या काळात मराठी मालिकेत काम केले होते. पण आता ती नामकरण या हिंदी मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत काम करण्यास रिमा खूपच उत्सुक आहे. याविषयी ती सांगते, "छोट्या पडद्यावर काम करायला मला खूप आवडते आणि त्यात या मालिकेची कथा ही महेश भट्ट यांनी लिहिली आहे. त्यामुळे या मालिकेत काम करण्याचा एक वेगळाच आनंद आहे. महेश भट्ट यांनी ही भूमिका लिहिल्यानंतर या भूमिकेसाठी केवळ मीच योग्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. त्यामुळे मी लगेचच या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेची कथा खूप चांगली असून एका सामाजिक प्रश्नावर या मालिकेद्वारे भाष्य करण्यात आले आहे."