Join us  

रिल लाइफ प्रमाणे रिअल लाइफमध्येही विवाहित आहे 'राणा'च्या'वहिनीसाहेब'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2017 10:13 AM

cnxoldfiles/a>मालिकेत पाठकबाईंशी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीला तुम्ही कसे बरे विसरणार. नंदिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या ...

cnxoldfiles/a>मालिकेत पाठकबाईंशी सतत डोकं लावत असणारी नंदिता वहिनीला तुम्ही कसे बरे विसरणार. नंदिनी वहिनी म्हणजे अभिनेत्री धनश्री काडगांवकरला या मालिकेमुळे चांगली लोकप्रियता मिळाल्याचे पाहयाला मिळतंय. मालिकेत तिच्या अभिनयासह तिच्या सौदर्यांनेही रसिकांचे मनं जिंकली आहेत.या मालिकेतील राणा दा (हार्दिक जोशी) आणि पाठकबाईंच्या (अक्षया देवधर) जोडीनं रसिकांची मनं आधीच जिंकली आहेत.त्यापाठोपाठ धनश्रीही आता सा-यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतेय.रसिकांना नंदिनी वहिनीचा येणारा राग हीच धनश्रीच्या भूमिकेची पोचपावती म्हणावी लागेल. राणादाच्या या वहिनी आणि सूरजच्या पत्नीची भूमिका साकारणारी धनश्री ही ख-या आयुष्यात विवाहित आहे.खुद्द धनश्रीनेच तिच्या लग्नाचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.ज्यांना धनश्री ही विवाहीत असल्याची बातमी वाचली असणार असे चाहते  तरूणांसाठी नक्कीच दुखावली गेले असतील.मात्र सोशल मीडियावर धनश्रीच्या लग्नाच्या खास फोटोंना खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत.धनश्रीचा हा  वेडींग अल्बम नेटीझन्सच्या पसंतीस उतरत असून तिच्या चाहत्यांनी  अनेक प्रश्न विचारत असल्याचे पाहायला मिळत आहेत. तिच्या साडी पासून ते तिच्या मेकअपपर्यंत सगळ्या गोष्टीची माहिती मिळवत असल्याचे पाहायला मिळत आहेत. रिल लाईफमध्ये जितकी धनश्री सुंदर दिसते तितकीच रिअल लाईफमध्येहीधनश्रीवर चाहते  फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. धनश्रीचे अरेंज मॅरेज असून डिसेंबर 2013 मध्ये  इंजिनिअर असलेल्या ध्रुवेशसोबत धनश्रीचे लग्न झाले आहे. सध्या मालिकेमुळे घराघरांत पोहचलेली नंदिनी वहिनीच्या (धनश्री) चाहत्या वर्गातही दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे.ती सतत फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरही अॅक्टिव आहे. त्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर तब्बल 1 लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत.धनश्री छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावरही झळकली होती. 'ब्रेव्हहार्ट' या सिनेमातून धनश्रीची मोठ्या पडद्यावर झळकली होती.संग्राम समेळ आणि धनश्री काडगांवकर अशी नवी जोडी रसिकांना या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाली होती. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला सध्या चांगलाच टीआरपी मिळत आहे. रांगडा गडी राणा आणि गावातील शिक्षिका अंजली यांची प्रेमकथेप्रमाणे वहिनी साहेबांचा खट्ट्याळपणाही प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे.