Join us

रिध्दिमाला राघवचा येतो राग,जाणून घ्या कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2017 14:31 IST

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा देशभरातील उत्कृष्ट नर्तकांमधील स्पर्धा कार्यक्रमाने प्रसारित झाल्यापासून नृत्यरसिकांची मने जिंकली आहेत. ‘डान्स चॅम्पियन्स’ ही ...

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा देशभरातील उत्कृष्ट नर्तकांमधील स्पर्धा कार्यक्रमाने प्रसारित झाल्यापासून नृत्यरसिकांची मने जिंकली आहेत. ‘डान्स चॅम्पियन्स’ ही अन्य वाहिन्यांवरील नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांचे विजेते आणि उपविजेते यांच्यातील स्पर्धा आहे. यांच्यातील अटीतटीच्या स्पर्धेत जो विजयी होईल, त्यावरून देशातील सर्वोत्कृष्ट नर्तक कोण आहे, ते दिसून येईल. मुळात इतर स्पर्धकांना हरवून आलेल्या नर्तकांमधील ही स्पर्धा असल्याने ती काहीशी अवघड आहे.‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात टेरेन्स आणि  रेमो डिसुझा हे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.रिध्दिमा पंडित आणि राघव जूयाल हे दोघेजण या कार्यक्रमाचे उत्तम प्रकारे सूत्रसंचालन करीत असताना टीव्हीवर दिसत असले, तरी पडद्यामागे सर्व काही आलबेल नाही, असे आमच्या कानावर आले आहे. सेटवरील एका सूत्राने सांगितले, “त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे राघव जेव्हा जेव्हा कार्यक्रमाच्य मंचावर येतो, तेव्हा त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. प्रेक्षक त्याचे उभे राहून स्वागत करतात. त्या तुलनेत रिध्दिमाला फारसा प्रतिसाद लाभत नाही. ही गोष्ट रिध्दिमाच्या पचनी पडत नाहीये आणि त्यामुळे प्रसिध्दीच्या झोतात राहण्यासाठी ती कधी कधी राघवचे संवाद स्वत:च म्हणते!”दरम्यान, रिध्दिमाशी निकटचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “राघव आणि रिध्दिमा यांच्यात चांगलाच सुसंवाद आहे. तिला सूत्रसंचालिकेची भूमिका आवडत असून ती कशाहीमुळे विचलित झालेली नाही. आता आपण बोलत असताना रिध्दिमा आपल्या कुटुंबियांसह आठवडाभराच्या दुबईच्या सुटीवर गेली असून ती कार्यक्रमाच्या चित्रीकरणापूर्वी परतेल.तिला हा कार्यक्रम अतिशय आवडत आहे.”राघव हा एंकरिंगमध्ये रिद्धीमापेक्षा अव्वल असल्यामुळे रिध्दीमाला कमी पसंती मिळत असल्याचे तिला वाटते. ती राघवपेक्षा कमी वाटु नये म्हणून आता शोच्या निर्मांत्यांनीही तिला पुन्हा तिच्या पूर्वीच्या लूकमध्ये म्हणजेच रोबोच्या अंदाजात दाखवण्याचा घाट घातला आहे. म्हणून आता ती रोबो स्टाइलने या शोचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. 'रजनी द रोबोट'ची भूमिका साकारणारी रिद्धीमा पंडित  छोट्या पडद्यावरची रोबो क्विन बनली आहे.रोबो स्टाइलमध्येच ती बॉलिवूड कलाकारांची नक्कल करताना दिसते. तिचा हा अंदाज आधीही रसिकांनी खूप पसंत केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रिध्दीमाचा अंदाज दाखवून कुठेतरी राघवसमोर ती कमी पडू नये यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.